Latur Hospital
Latur Hospital Saam Tv
महाराष्ट्र

गाव उजळायला गेला अन् कुटुंबावर अंधार पडला; विजेचा धक्का लागल्याने कामगाराचा मृत्यू

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : विद्युत तारेचे काम करण्यासाठी पोलवर चढलेल्या गेलेल्या एका कामगाराचा विजेचा धक्का (Electric Shock) लागून मृत्यू झाला. ही दुःखद घटना रविवारी रात्री लातूर (Latur) जिल्ह्यातील नांदगाव परिसरात घडली. महावितरण (Mahavitaran) कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बाबा शेख यांचा मृत्यू झाला, असा आरोप मृत बाबा शेख कुटुंबीयांनी केला आहे. तसेच संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. (Latur Latest Marathi News)

बाबा शेख असे मृत झालेल्या कामगाराचे नाव असून ते हरंगुळ येथील रहिवासी आहे. माहितीनुसार, बाबा शेख यांच्यासह अन्य दोन कामगार नांदगाव येथे विद्युत तारेच काम करण्यासाठी आले होते. तेव्हा गावचे सरपंच ढमाले यांनी त्यांना हटकले. तेव्हा बाबा शेख यांनी आम्हाला लाईनमन होळीकर आणि गायकवाड मॅडम यांनी हे काम करण्यास सांगितले असल्याचे सरपंचाला सांगितले. मात्र तरीही विद्युत प्रवाह बंद असल्याची खात्री करून घ्या असे सरपंच ढमाले यांनी शेख यांच्यासह इतर कामगारांना सांगितले.

त्यावेळी बाबा शेख यांनी लाईनमन प्रशांत होळकर यांना फोन लावला आणि विद्युत पुरवठा बंद असल्याची खात्री केली. त्यानंतर त्यांनी पोलवर चढून कामाला सुरुवात केली. त्यांचं काम सुरू असतानाच विद्युत पुरवठा प्रवाहीत झाला आणि बाबा शेख यांना विजेचा धक्का बसला. त्यानंतर ते खाली कोसळले. पोलला आधार देण्यासाठी रोवण्यात आलेल्या सळईवर ते पडल्याने त्यांच्या पोटात सळई घुसली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, सरपंच ढमाले आणि अन्य त्यांच्या साथीदारांनी बाबा शेख यांना तत्काळ लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात जाण्याआधीच बाबा शेख यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र बाबा शेख यांच्या संतप्त नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित लाईनमन होळीकर, आणि गायकवाड मॅडम यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. बाबा शेख यांच्या पश्चात दोन मुलं, एक मुलगी, पत्नी, आई वडील, भावंडं असा परिवार आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election: 'मोदी-राज' सभेनंतर उद्धव ठाकरे सुपरफास्ट, मुंबईत एकाच दिवशी 4 सभांचा धडाका

Maharashtra Politics 2024 : 'अजित पवारांवरील आरोप सिद्ध झाले नाहीत'; फडणवीसांची अजितदादांना जाहीर क्लीन चिट

Lord Shiva: महादेवाच्या पिंडावर थेंब-थेंब पाणी टाकणारे कलश का ठेवलं जातं?

South Mumbai Lok Sabha: दक्षिण मुंबईचा खासदार कोण होणार? शिवसेनेच्या दोन गटात लढत

Vaibhav Kale : कर्नल वैभव काळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; गाझातील बॉम्ब हल्ल्यात झाले होते शहीद

SCROLL FOR NEXT