Washim Crime Saam Tv
महाराष्ट्र

Washim: मोबाइलमधील प्रायव्हेट व्हिडीओ चोरले, तिघांकडून ब्लॅकमेलिंग, त्रासलेल्या तरुणाचा SP कार्यालयासमोर धक्कादायक कृत्य

Washim Crime: वाशिममध्ये ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून तरुणाने पोलिस अधीक्षक कार्यालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. या तरुणाने विष प्राशन केले. या घटनेमुळे वाशिममध्ये खळबळ उडाली आहे.

Priya More

मनोज जयस्वाल, वाशिम

वाशिमच्या अनसिंग येथील एका तरुणाने ब्लॅकमेलिंगला कंटाळून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. या तरुणाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करूनही त्याची दखल घेतली गेली नाही त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मनिष ठाकूर असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचं नाव असून या तरुणाचे काही प्रायव्हेट व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमधून चोरी करून ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याला ब्लॅकमेल केले जात होते. अनिल मारुती शिंदे, संजय जोगी आणि सुनील ठाकरे या तिघांकडून या तरुणाला ब्लॅकमेल केले जात होते.

मनिष ठाकूर याच्याकडून या तिघांनी एकदा ५० हजार रुपये सुद्धा उकळले होते. यासंदर्भात मनिष ठाकूर यांनी पोलिसात तक्रार दिली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तर या तीन तरुणांकडून मनिषला पुन्हा वारंवार ब्लॅकमेलिंग केले जात असल्याने या प्रकाराला कंटाळून अखेर आज मनीष ठाकूरने आधी एक व्हिडिओ बनावला. त्यानंतर त्याने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जाऊन विष प्राशन केलं आणि आत्महत्येचा प्रयत्न केला.

वाशिमच्या पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, 'मोबाईल हॅक झाला म्हणून तक्रार देण्यात आली होती. मात्र मोबाईल हॅक झाला नसल्याचे तपासातून समोर आलं. ब्लॅकमेलिंग झाल्याची शक्यता असून त्या तक्रारीचा व्यवस्थित तपास चालू आहे. यातील विष प्राशन करणाऱ्यावर दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात बलात्कार आणि ॲट्रॉसिटी असे गुन्हे दाखल आहेत. तरी पण त्यांनी जी तक्रार दिलेली आहे त्याचा योग्यरित्या तपास करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास करून जो आरोपी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : “किती बी समोर येऊ द्या, एकटा बास”, भास्कर जाधव यांच्या स्टेटसने वादाला मिळाली नवी फोडणी

Accident News : बस- कारचा भीषण अपघात; कारमधील दोघे गंभीर जखमी

Jalebi History : जिलेबीचा उगम भारतात नव्हे, तर या देशात! वाचा गोड इतिहास एका क्लिकवर

MNS: 'नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं!', मनसेचा अमराठी भाषिकांना इशारा; संदीप देशपांडेंच्या टी-शर्टने वेधलं लक्ष

Rinku Rajguru: में ख़ुद अपनी तलाश में हूँ...; रिंकू राजगुरुचे रॉयल लूक फोटो पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT