Young Farmer Died By Transformer Shock अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

Bhandara: दुरुस्तीसाठी रोहित्रावर चढलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्देवी मृत्यू; गावात हळहळ

अभिजीत घोरमारे

भंडारा: एका तरुण शेतकरी तरुणाचा विजेच्या धक्क्याने (Electric Shock) दुर्देवी मृत्यू झाला आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील तरुण शेतकरी शरद यादो धोटे, रा. भागडी या ३२ वर्षीय तरुणाला विद्युत रोहित्राचा झटका लागल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्याने हा तरुण बिघाड दुरुस्त करण्यासाठी थेट रोहित्रावरच चढला आणि अचानक शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. (Accidential Death of Young Farmer)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदुर तालुक्यातील चिचोली-भागडी शिवारात घडली आहे. सिंचन खोळंबल्याने बिघाड दुरुस्तीसाठी रोहित्रावर चढणे या तरुणाच्या जीवावर बेतले आहे. शरदचे चिचोली-भागडी शिवारात दोन एकर शेत आहे. शेत सिंचनासाठी कृषी वीजपंप आहे. शरद सकाळी नेहमीप्रमाणे शरद पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेला. मोटारपंप सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र पंप सुरू न झाल्याने वीज पुरवठ्यात बिघाड झाला असावा, असे त्याला वाटले. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तो शेतातील रोहित्राजवळ पोहोचला, यावेळी शरदने रोहित्राचा वीजपुरवठा बंद केला आणि वर चढला.

मात्र, काही कळायच्या आत त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. रोहित्रावर लटकलेल्या अवस्थेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांना, महावितरण कंपनीला आणि पोलिसांना देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला आहे. या दुर्देवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील बैठकीत मराठा समाजासोबत दुजाभाव, योगेश केदार यांचा आरोप

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

Shirur Breaking News : शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्यात राडा!

Dangerous Tourist Destinations : भारतातील सर्वात खतरनाक पर्यटनस्थळे, जाण्यापूर्वी एकदा विचार करा

Mumbai Fight Video: बारच्या वॉचमनशी वाद; कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांसमोरच तरुणाला केली बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT