राज्यात माराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच आता धनगर आरक्षणाचा प्रश्नही उभा राहिलाय. आरक्षणासाठी धनगर समाजाकडून अनेक बैठका घेण्यात आल्यात. अशात आता एका तरुणाने आरक्षणासाठी टोकाचं पाऊल उचललं आहे. या तरुणाने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने आपलं जीवन संपवलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, धनगर आरक्षणासाठी परभणी तालुक्यात एका युवकाने आत्महत्या केली आहे. परभणी तालुक्यातील आर्वीत गावात राहणाऱ्या युवकाने धनगर आरक्षणासाठी स्वत:चं संपवल जीवन संपवलंय. शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेत त्याने आत्महत्या केलीये.
शिवाजी दत्तराव कारके, असे या मयत युवकाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी मयत युवकाने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या नोटमध्ये आरक्षणाची मागणी पूर्ण होत नसल्याने मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्याने लिहिलंय. पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली असून पुढील तपासा सुरू आहे.
धनगर आरक्षण मागणीसाठी पंढरपुरात राज्यव्यापी बैठक
धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर चर्चा करण्यासाठी 29 डिसेंबर रोजी पंढरपुरात राज्यव्यापी बैठक पार पडली होती. या बैठकीसाठी सर्व पक्षाचे आजी माजी आमदार, खासदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकार्यांना निमंत्रण देण्यात आले होते. पंढरपुरातील श्रेयश पॅलेसमध्ये ही बैठक पार पडली होती.
धनगर समाजाची मागणी काय?
एसटी प्रवर्गातून धनगर आरक्षण द्यावे अशी मागणी धनगर समाजाकडून करण्यात आली आहे. आरक्षण लढ्याच्या संदर्भात दिशा ठरवण्यासाठी राज्यभरातील धनगर आरक्षण समन्वयकांची व पदाधिकाऱ्यांची राज्यव्यापी बैठक बोलावण्यात आली होती.
मेढ्यात आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज रस्त्यावर
आरक्षणाच्या मागणीसाठी १८ डिसेंबर रोजी धनगर समाजाने साताऱ्यातील मेढ्यात मोर्चा काढला.या मोर्चात सातारा जिल्ह्यातील धनगर समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.धनगर समाजाचा ST प्रवर्गात समावेश व्हावा या मागणीसाठी मेढा बस स्थानकापासून ते मेढा तहसीलदार कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाचा बापाचे अशा घोषणा यावेळी मोर्चात देण्यात आल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.