Parbhani News : प्रहारचा दिव्यांगांच्या मागण्यांसाठी मोर्चा, पूर्णा- ताडकळस महामार्ग रोखून धरला

तहसील कार्यालय व पंचायत समिती येथे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
prahar janshakti party morcha at purna parbhani
prahar janshakti party morcha at purna parbhanisaam tv
Published On

Parbhani News :

प्रहार जनशक्ती पक्ष पूर्णा शाखेच्या वतीने पूर्णा तालुक्यातील दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचा भव्य मोर्चा तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील दिव्यांग, निराधार परितक्त्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (Maharashtra News)

तहसीलदार निवेदन स्वीकारण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये प्रवेश देत नसल्याने संताप्त झालेल्या आंदोलकांनी पूर्ण ताडकळस हा महामार्ग एक तास रोखून धरला त्यामुळे एकच खळबळ उडाली पोलीस प्रशासनाने केलेल्या मध्यस्थीनंतर नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारले व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

prahar janshakti party morcha at purna parbhani
Ayodhya Ram Mandir: सव्वा दोन कोटी रामनाम जप पुस्तिका पाठविल्या जाणार अयोध्येला, नंदनगरीतील नागरिकांचा उपक्रम

पूर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत मार्फत दिव्यांगांसाठी असलेल्या पाच टक्के निधीचे वाटप केले जात नाही तो निधी तत्काळ वाटप करण्यात यावा ज्या ग्रामपंचायत ५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचे वाटप करत नाहीत अशा ग्रामपंचायतीवर फौजदारी गुन्हा प्रशासनाने दाखल दाखल करावेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घरकुल योजनेत गावातील दिव्यांग विधवा निराधार यांना प्राधान्य देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने दिव्यांगांचा हा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. तहसील कार्यालय व पंचायत समिती येथे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

Edited By : Siddharth Latkar

prahar janshakti party morcha at purna parbhani
Loksabha Election 2024: रविकांत तुपकरांनी लोकसभेसाठी शड्डू ठोकला, राजू शेट्टींकडून 'स्वाभिमानी'च्या सहा जागा जाहीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com