Yavatmal Widow Women Sold Saam Tv News
महाराष्ट्र

Crime: विधवेला सासरच्यांनीच दीड लाखांत विकलं; नोकरीची भूलथाप देत मध्यप्रदेशात नेलं अन्..

Yavatmal Widow Women Sold: पतीच्या मृत्यूनंतर सासरच्यांनी विधवा महिलेला तब्बल १.२० लाखांना गुजरातमध्ये विकले. तिथं दोन वर्षे लैंगिक शोषण झालं. पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे.

Bhagyashree Kamble

पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर सासरच्यांनी एका विधवा महिलेची तब्बल एक लाख वीस हजार रुपयांना गुजरातमध्ये विक्री केली. त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीने तिचे दोन वर्षे शोषण केलं. मुलगा जन्मल्यानंतर तिला गावी आणून सोडण्यात आले. यानंतर तिनं थेट पोलीस
ठाणे गाठले. ही धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पीडित महिला यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील रहिवासी आहे. पती आणि एका मुलाच्या मृत्यूनंतर ती आपल्या दुसऱ्या मुलगा व मुलीसह सासरच्यांकडे राहत होती. महिलेची आर्थिक स्थिती हालाखीची होती. त्यामुळे तिच्या नणंद आणि नणंदेच्या नवऱ्यानं तिला रोजगार मिळवून देण्याचे आमिष दाखवले. तसेच मध्यप्रदेशात नेले. मात्र, तिथून तिला गुजरातमधील पोपट चौसाने नावाच्या व्यक्तीला विकण्यात आले.

त्या महिलेची सुमारे १ लाख २० हजार रूपयात विक्री करण्यात आली. त्या व्यक्तीनं सुमारे दोन वर्षे तिचे लैंगिक शोषण केले. या संपूर्ण प्रकरणात पीडित महिलेच्या सासू, सासरच्या दुसऱ्या पतीसह नणंद, नंदई आणि दिर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पोपट चौसाने यालाही आरोपी करण्यात आलं आहे.

२०२३ साली पीडित महिलेच्या आई-वडिलांनी त्यांची मुलगी आणि नातवंडांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने आर्णी पोलिसांनी तपास सुरु केला. संबंधित महिला गावीच असल्याची माहिती त्यांना मिळाली. चौकशीत सर्व प्रकार उघड झाला. यावरून पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuljapur News: तुळजापुरात भाजप अन् जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते आमनेसामने

Crime : २१ वर्षीय तरुणीचा रात्री संशयास्पद मृत्यू, पहाटेच अंत्यसंस्कार, नेमकं कारण काय?

Jaya Bachchan: 'हे काय करताय तुम्ही...'; जया बच्चन यांना राग अनावर, सेल्फी काढायला आलेल्या व्यक्तीला दिला जोरात धक्का

Padsare Waterfall : धबधब्यावर भिजायला आवडतं? मग 'पडसरे धबधबा' तुमच्यासाठी ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra Politics : भाजपला नवी मुंबईत खिंडार, ठाकरे गटाने दिला मोठा धक्का; VIDEO

SCROLL FOR NEXT