Santosh Dhawale Removed From Shiv Sena Party Saam
महाराष्ट्र

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी; नेमकं कारण काय?

Santosh Dhawale Removed From Shiv Sena: यवतमाळ विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांची शिवसेनेतून हकालपट्टी. पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप.

Bhagyashree Kamble

संजय राठोड, साम टिव्ही

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमधून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे यवतमाळ विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर इतर पक्षाचा प्रचार केल्याचा आरोप आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे ठाकरे गटाने त्यांना पक्षातून हकालपट्टी केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यवतमाळ विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यवतमाळ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तसेच शिवसेनेच्या अधिकृत नगरसेवक उमेदवारांच्या विरोधात जाऊन, त्यांनी काँग्रेस पक्षाचा प्रचार केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाची तक्रार शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे केली होती. दरम्यान, पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत संतोष ढवळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा पक्षाचे सचिव विनायक राऊत यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

माहितीनुसार, संतोष ढवळे यांची ओळख एक कट्टर शिवसैनिक म्हणून होती. २०१४ साली त्यांनी यवतमाळमध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार मदन येरावार यांच्याकडून केवळ सुमारे एक हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, संतोष ढवळे यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुरबाडमध्ये MIDC च्या जमिनीच्या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

उज्जैनच्या मंदिरात चेंगराचेंगरीची स्थिती; नागचंद्रेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी; ३ जण जखमी

Income Tax च्या ऑफिसला भीषण आग; परिसरात धराचे लोट, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी|VIDEO

भेसळयुक्त साखर कशी ओळखायची? घरी या’ 3 सोप्या स्टेप्सने करा चेक

Rahul Gandhi : राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; कारवाई थांबवण्याचे हायकोर्टाला आदेश, ईडी-सीबीआयलाही थेट सांगितलं

SCROLL FOR NEXT