Yavatmal Crime News Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal Crime News: जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या! यवतमाळ जिल्ह्यात खळबळ

यवतमाळ जिल्ह्यात एकच दिवशी दोन हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

संजय राठोड, प्रतिनिधी...

Yavatmal Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गंभीर गुन्हेगारी घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील एमपीएससी करणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या झाल्याने राज्यात खळबळ उडाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच यवतमाळमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, यवतमाळ शहरात जुन्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना यावयमाच्या नागपूर रोड मार्गावर झाली. ज्ञानेश्वर रमेश मस्के असे या घटनेतील मृताचे नाव आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात शहर पोलिसांनी काही अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. याआधी यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात शेतीच्या वादातून एकाची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर लगेच ही घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात एकच दिवशी दोन हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

विहिरीत आढळले चार मृतदेह...

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील बाभूळगावमध्ये एकाच विहरीत चार मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरगुती वादातून पतीनेच आपली पत्नी आणि तिन मुलांचा जीव घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींची पत्रकार परिषद सुरू

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून गूड न्यूज! ५ हजार रुपये मदतीसह कर्जमाफीबाबत महत्त्वाचे ८ मोठे निर्णय

PM Kisan Yojana: दसरा की दिवाळी? शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2,000 कधी जमा होणार? PM किसानच्या हप्त्यावर अपडेट समोर

मोठी बातमी! रोहित शर्मा पुन्हा होणार मुंबईचा कर्णधार, हार्दिक पांड्याचा पत्ता कट होणार?

High cholesterol: ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल वाढलंय? दोन्ही समस्यांवर तूप ठरेल रामबाण उपाय, जाणून घ्या पद्धत

SCROLL FOR NEXT