Yavatmal Arni Taluka News Saam TV
महाराष्ट्र

Yavatmal News : देवीचे विसर्जन करायला गेले अन् अनर्थ घडला; 3 तरुणांच्या मृत्यूने अख्खा तालुका हळहळला

Yavatmal Arni Taluka News : एकाच दिवशी 3 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने आर्णी तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

Satish Daud

संजय राठोड, साम टीव्ही

यवतमाळ : नवरात्रीचा उत्सव संपल्यानंतर देवीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्देवी घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या. अरुण जाधव, मिथुन राठोड आणि प्रकाश राजुरकर अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. एकाच दिवशी तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने अख्खा तालुका हळहळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना माळहिवरा परिसरात घडली. येथे देवीचे विसर्जन करण्यासाठी अरुण जाधव हा तलावात उतरला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. गावातील इतर नागरिकांनी त्याचा शोध घेतला असता अरुणचा मृतदेह खोल पाण्यात आढळून आला.

दुसरी घटना चिकणी (कसबा) परिसरात घडली. मिथुन लोहबा राठोड हा व्यक्ती दुर्गादेवीचे विसर्जन करण्यासाठी गेला असता पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. तर तिसरी घटना आर्णीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जवळा परिसरात घडली. येथील प्रकाश लक्ष्मण राजूरकर हे देवीचे विसर्जन करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचाही पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांत आकास्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

गोंदियात तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू

गोंदियात देखील देवीच्या विसर्जनादरम्यान तलावात खोदलेल्या खड्डात पडून तीन तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सावरी टोला (रावणवाडी) येथील संकुलात शनिवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली. आशीष फागुलाल दमाहे (वय २२), अंकेश फागुलाल दमाहे (वय १९), यश गंगाधर हिरापुरे (वय १९) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

तिघेही सावरी ता. गोंदिया येथील रहिवासी होते. दरम्यान, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आशिष दमाहे या तरुणांची नुकतीच इंडियन आर्मीमध्ये निवड झाली होती. प्रशासकीय प्रक्रियेनंतर तो सरकारी सेवेत रुजू होणार होता. मात्र, तत्पूर्वीच काळाने घाला घातल्याने दमाहे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तीन तरुणांच्या निधनामुळे संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT