Yavatmal Accident News Saam TV
महाराष्ट्र

Accident News : रेणुका मातेच्या दर्शनाहून येताना कारचा भीषण अपघात; अहमदनगरमधील 2 भाविक ठार, 6 जखमी

Yavatmal Accident News : पुसद-वाशिम महामार्गावरील सत्तरमाळ घाटात भाविकांची कार झाडावर आदळली. या अपघातात अहमदनगर येथील दोन भाविकांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत.

Satish Daud

संजय राठोड, साम टीव्ही

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद-वाशिम महामार्गावरील सत्तरमाळ घाटात कारचा भीषण अपघात भाविकांना देवदर्शनाहून घेऊन निघालेली कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट झाडावर आदळली. या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर ४ ते ५ भाविक गंभीर जखमी झाले आहेत. आज सोमवारी (ता. ७) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातं आहे. अद्याप मृतक आणि जखमी यांची नावे कळू शकली नाही. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर येथील ८ भाविक रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी माहुर गडावर गेले होते.

दर्शन घेऊन पुसद मार्ग ते नगरकडे परतत होते. पुसद-वाशिम महामार्गावरील सत्तरमाळ घाटात कार आली असता, अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत दोन भाविकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून जखमींना वाशिम आणी पुसद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अद्याप मृतक आणि जखमी यांचे नावे कळू शकली नाही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport : सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज! 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा, मुंबई-गोव्याला काही तासात पोहचणार!

SCROLL FOR NEXT