Yavatmal Rain Alert Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal Rain Alert : यवतमाळ जिल्ह्यात पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

Yavatmal News : दडी मारलेल्या पावसाने काही भागात जोरदार हजेरी लावली आहे तर काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा लागून आहे. पावसाअभावी पिके जळत असून यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

Rajesh Sonwane

संजय राठोड 
यवतमाळ
: गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. यामुळे जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा लागून होती. यातच यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून पावसाने जोर धरला असून बहुतांश तालुक्यांमध्ये रिमझिम तर काही तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. यात हवामान विभागाकडून जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मागील पंधरवड्यात राज्यात पावसाने दडी मारली होती. यामुळे पावसाची प्रतीक्षा लागून होती. यातच दोन- तीन दिवसांपासून राज्यातील काही भागात जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. तर काही भागात अजून प्रतीक्षा आहे. याच दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात कालपासून पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतीला दिलासा मिळाला असून बळीराजा देखील सुखावला आहे. 

जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट 

काही ठिकाणी पिकांच्या मुळांजवळ पाणी साचण्याची शक्यता वाढली आहे. हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील २४ ते ४८ तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना नदी- नाले, ओढे, तसेच पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी अनावश्यक वावर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील काही भागात प्रतीक्षा 

राज्यातील काही भागात जोरदार पावसाची सुरवात झाली असली तरी काही भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा लागून आहे. पावसाअभावी शेतातील पिके करपू लागली असून शेतकऱ्यांच्या नजर आकाशाकडे लागलेल्या आहे. येत्या काही दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Maharashtra News Live Update: राजापूर रेल्वे स्थानकावर मुंबईला परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांची गर्दी

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Indian Forts : बाहेर रणरणतं ऊन अन् किल्ल्यात गारवा! 'या' ७ किल्ल्यांची वास्तुकला पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT