Yavatmal News Saam Tv
महाराष्ट्र

यवतमाळमध्ये टॉवरवर चढून विरुगिरी; जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढून त्याने प्रशासनाला जेरीस आणले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढून दिग्रसच्या श्याम गायकवाड याने विरुगिरी आंदोलन केले. सकाळी सात वाजता हा तरुण टॉवरवर चढला. ही बाब लक्षात येताच खळबळ उडाली. श्याम गायकवाड हा दिग्रस तालुक्यातील रहिवासी असून, तो यापूर्वी अनेकदा टॉवरवर चढला आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढून त्याने प्रशासनाला जेरीस आणले.

हे देखील पाहा -

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मागणी त्याने लावून धरली. दिग्रस तालुक्यातील इसापूर येथील शेत सर्व्ह नंबर सात या शाळेच्या जमिनिवरील आणि काही शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून ती जमीन गरिबांना वाटप करण्यात यावी,तसेच आपल्यावरील जुना आत्महत्येचा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी टॉवरवर चढला.

घटनास्थळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, आपत्ती पथक, अग्निशमन दल दाखल झाले. या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली. अधिकाऱ्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कुणाचे काही ऐकण्याच्या मानसिकतेत नाही.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

Tejaswini Pandit: महाराष्ट्र हरलास तू ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी पोस्ट, म्हणाली...

Dharmarao Baba Atram: शरद पवारांचं राजकारण संपलं, विजयी होताच धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान

Belapur : संदीप नाईकांचा 377 मतांनी निसटता पराभव, अपक्ष संदीप नाईकांना 513 मते, तुतारीसारख्या ट्रम्पेटलाही भरघोस मते

Yashasvi Jaiswal: पर्थवर यशस्वी जयस्वाल नावाचं तुफान; कांगारू गोलंदाजांची धुलाई करत ठोकलं शतक

SCROLL FOR NEXT