Yavatmal Police Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal Police : १३ वर्षापासून नाव बदलून यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्य; दीड महिन्याच्या मागोव्यानंतर नक्षलवाद्याला अटक

Yavatmal News : छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशातील नारायणपूर जिल्ह्याच्या जंगलाची सीमा आहे. या दोन्ही भागात नक्षल चळवळ सक्रिय आहे. तेथेच नव्याने चळवळीत दाखल होणाऱ्या नक्षल्यांचे प्रशिक्षण आणि कटकारस्थाने रचले जातात

Rajesh Sonwane

संजय राठोड
यवतमाळ
: छत्तीसगड राज्यातील नक्षल कमांडरच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. मागील १३ वर्षांपासून जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या नक्षलवाद्याला स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने तब्बल दीड महिन्याच्या मागोव्यानंतर यवतमाळ शहरातील लकडगंज परिसरात केली. या कारवाईने पुन्हा एकदा वणी तालुकाच नव्हेतर जिल्ह्याचे केंद्र असलेले यवतमाळ मुख्यालय नक्षल्यांचे 'रेस्ट झोन' आहे का हा सवाल उपस्थित करण्यात आला आहे

गडचिरोली जिल्ह्यातील टीप्पागड हा एक छोटासा किल्ला आहे. सावरगाव आणि देसाईगंज (वडसा) पासून शंभर किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात आहे. शिवाय त्याला लागून छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशातील नारायणपूर जिल्ह्याच्या जंगलाची सीमा आहे. या दोन्ही भागात नक्षल चळवळ सक्रिय आहे. तेथेच नव्याने चळवळीत दाखल होणाऱ्या नक्षल्यांचे प्रशिक्षण आणि कट कटकारस्थाने रचले जातात. 

नक्षल चळवळीच्या तिजोरीवरच मारायचा डल्ला 

छत्तीसगड राज्यातील भुथिया पहाडगंज दलममध्ये सक्रिय असलेल्या तुलसी उर्फ दिलीप महतो असे नक्षली कमांडरचे नाव आहे. दिलीप नक्षल दलम कमांडरने सहकाऱ्यांचा विश्वासघात करीत नक्षल चळवळीच्या तिजोरीवरच आर्थिक डल्ला मारला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस होताच सहकारी त्याचा बदला घेण्याच्या तयारीत होते. मात्र गेम होणार याची पूर्वकल्पना असल्याने नक्षल कमांडर तेथून पसार झाला जावून यवतमाळ जिल्ह्यातील वणी या ठिकाणी येऊन वास्तव्यास होता. 

पोलिसांनी सापळा रचत घेतले ताब्यात 

नक्षल कमांडर दिलीप याने आपला मुक्काम पारवा आणि नंतर यवतमाळ शहरात तलाव फैल भागात ठोकला. साधारण १३ वर्ष त्याने मुक्काम यवतमाळ शहरात केला. या दरम्यान त्याने आपली नावे बदलवून वास्तव्यास राहिला. या नक्षलीची माहिती पोलिसांना गुप्त महितीगारकडून मिळाली. त्यानंतर त्याची ओळख पटवून यवतमाळ पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT