Yavatmal Accident Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal Accident : वणी- मारेगाव मार्गावर कार- ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, ५ गंभीर जखमी

Yavatmal News : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकने कारला उडविले. उतार असल्याने ट्रक चालकांकडून गाडीवर नियंत्रण मिळविता आले नाही.

Rajesh Sonwane

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळच्या वणी- मारेगाव मार्गावरील निंबाळा उतारावर दुपारच्या सुमारास कार आणि ट्रकचा भीषण (Accident) अपघात झाला. या अपघातात कर चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य प्रवाशी जखमी झाले आहेत. (Yavatmal) त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  (Live Marathi News)

यवतमाळच्या वणी- मारेगाव या मार्गावर सिमेंट वाहतुक करणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. निंबाळा उतारावर हा अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकने कारला उडविले. उतार असल्याने ट्रक चालकांकडून गाडीवर नियंत्रण मिळविता आले नाही. यामुळे मारेगाव येथून चंद्रपूरकडे जाणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील चालकाचा मृत्यू झाला. नवाज मुझफ्फर शेख, असे मृत झालेल्या चालकाचे नाव आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ट्रक चालकासह ५ जण गंभीर जखमी 

या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या अपघातात दोन महिला व दोन लहान मुलांसह ५ व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर प्रत्यक्षदर्शीनी व पोलिसांनी धाव घेत जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hypertension Symptoms: शरीरात दिसतायत ही ५ बदलती लक्षणं? वेळेत ओळखा वाढलेल्या ब्लड प्रेशरचा धोका

Jio Recharge Plan: Jioचा फक्त १२५ चा प्लान, कॉलिंग अन् डेटासह मिळणार खूपकाही फायदे

Sanai Chaughade: ३०० कोटींची मालकीण पुन्हा छोट्या पडद्यावर? 'सनई चौघडे' मालिकेत येणार नवा ट्विस्ट

Green Mango Chutney: नेहमीची हिरवी चटणी नकोय? मग ट्राय करा 'कैरीची लाल चटणी'; न खाणारेही खातच राहतील

Maharashtra News Live Update: मालेगावच्या भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात

SCROLL FOR NEXT