संजय राठोड
यवतमाळ : यवतमाळच्या दिशेने जात असलेल्या बसला एका वाहनाने धडक दिली. यानंतर वाद निर्माण झाला. या (Yavatmal) वादात खाजगी वाहन चालकांकडून बस चालकाला मारहाण केली. जीव वाचविण्यासाठी बस चालकाने थेट पोलीस स्थानकात धाव घेतली. (Maharashtra News)
घाटंगी येथून यवतमाळकडे राज्य परिवहन महामंडळाची बस (MSRTC Bus) मार्गस्थ झाली. दरम्यान नागपूरकडून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाने घाटंजी बायपासजवळील वळण रस्त्यावर बसला जोरदार धडक दिली. यामुळे बस चालक व वाहन चालक यांच्यात वाद निर्माण झाला. या वादा दरम्यान खासगी वाहन चालकाने कमरेचा पट्टा काढून बस चालकाला मारहाण केली. या सर्व प्रकारचा व्हिडीओ एका प्रवाशाने काढला असून तो व्हायरल झाला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बस चालक थेट पोलिसात
यवतमाळ आगारातील ज्ञानेश्वर जाधव असे मारहाण झालेल्या बस चालकाचे नाव आहे. बेदम मारहाण होत असताना जीव वाचवण्यासाठी बस चालकाने अवधूतवाडी पोलिस (Police) ठाण्यात धाव घेतली. यानंतर येथे तक्रार दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.