Anganwadi Worker Strike : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पुन्हा ठिय्या आंदोलन; सरकार विरोधात घोषणाबाजी

Washim News : अंगणवाडी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी मागील ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर गेल्या आहेत. त्यांच्या संपाला आज ५२ दिवस झाले आहेत.
Anganwadi Worker Strike
Anganwadi Worker StrikeSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 

वाशिम : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटक संघटनेच्यावतीने वाशिमच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी मागील ५२ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निषेध व्यक्त करत ठिय्या आंदोलन केले. (Latest Marathi News)

Anganwadi Worker Strike
Kalyan Crime : भररस्त्यात चैन तोडून पळणाऱ्या चोरटा रंगेहाथ ताब्यात

अंगणवाडी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी मागील ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर गेल्या आहेत. त्यांच्या संपाला आज ५२ दिवस झाले आहेत. मागण्यांबाबत वारंवार चर्चा होऊन देखील कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाही. यामुळे अंगणवाडी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. जोपर्यंत सरकार मागण्यांबाबत कोणताही तोडगा काढत नाही; तोपर्यंत संप मिटणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांची आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Anganwadi Worker Strike
Prakash Shendge : अन्यथा ओबीसी समाजाचाही २६ तारखेला मुंबईत मोर्चा; प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा

सरकारविरोधात घोषणाबाजी 

वाशीम येथे आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून मागण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महिला या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मागण्यांबाबत निर्णय घेत नसल्याने सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com