yavatmal news saam tv
महाराष्ट्र

Yavatmal Police News : एलसीबीची माेठी कारवाई, सहा अटकेत; यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोलीसह वाशिमच्या 48 दुचाकी हस्तगत

Yavatmal Crime News : या संशयितांची पाेलिस कसून चाैकशी करीत आहेत. त्यातून आणखी गुन्हे उघडकीस येतील अशी आशा पाेलिसांना आहे.

Siddharth Latkar

- संजय राठाेड

Yavatmal News : यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चाेरणारी टाेळी जेरबंद केली आहे. पाेलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 48 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. यवतमाळ येथे आत्तापर्यंतची ही सर्वांत माेठी कारवाई मानली जात आहे. (Maharashtra News)

या टाेळीने यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम आदी जिल्ह्यातून मोटारसायकल चोरून आणल्याची कबुली पाेलिसांना दिली आहे. यवतमाळ व इतर जिल्ह्यातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांकडून तब्बल 28 लाख 97 हजार रुपये किमतीच्या 48 मोटरसायकल हस्तगत केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. पवन बनसोड यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार या प्रकरणी निलेश सूर्यवंशी (राहणार वरवट,नांदेड), सिद्धार्थ काळबांडे (राहणार उमरखेड-यवतमाळ), अनिल रावते (राहणार उमरखेड - यवतमाळ), तानाजी कतुलवाड (राहणार हिमायतनगर- नांदेड) आणि राजू काळबांडे (राहणार उमरखेड- यवतमाळ) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. या संशयितांची पाेलिस कसून चाैकशी करीत आहेत. त्यातून आणखी गुन्हे उघडकीस येतील अशी आशा पाेलिसांना आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT