Bharat Jadhav
सर्वप्रथम सुकामेवा म्हणजेच काजू, बदाम, मनुक्याचे बारीक तुकडे करा. ते एका गरम पाण्यात किंवा संत्र्याच्या ज्यूसमध्ये 30 मिनिटे भिजत ठेवा.
यासाठी एका पातेल्यात साखर घ्या, ती गॅसच्या मंद आचेवर वितळवा. साखर गडद ब्राउन रंगाची झाली की त्यात थोडे गरम पाणी टाका आणि साखरेचा पाक तयार करा.
एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दालचिनी पूड, जायफळ पूड आणि मीठ.
एका दुसऱ्या भांड्यात बटर आणि कंडेन्स्ड मिल्क किंवा साखर एकजीव करून घ्या म्हणजे मिक्स करा. त्यात कॅरामेल सिरप आणि व्हॅनिला इसेन्स घाला.
आता कोरडे साहित्य आणि भिजवलेला सुकामेवा हळूहळू मिश्रणात घाला. गरजेनुसार दूध घालून स्मूथ (बॅटर)मिश्रण तयार करून घ्या.
केक थंड झाल्यावर टिनमधून काढा आणि स्लाइस करून सर्व्ह करा