Yavatmal Crime Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal Crime : एसबीआयच्या दोन एटीएममध्ये छेडछाड; सव्वा लाखांची रोकड लंपास, चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

Yavatmal News : बसस्थानक चौकापासून हाकेच्या अंतरावर ट्रॅव्हल्स पॉइंट असून परिसरात एसबीआयचे एटीएम आहे. या मार्गावर रात्रीही वर्दळ असते. अशा स्थितीत तीन ते चार लोकांनी एटीएममध्ये प्रवेश करून मशिनमध्ये छेडछाड केली

Rajesh Sonwane

संजय राठोड 

यवतमाळ : रात्रीच्या अंधारात चोरट्यांकडून बँक एटीएम मशीन लक्ष केले जात आहेत. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन तोडून किंवा छेडछाड करून यातील रक्कम लांबविली जात आहे. अशाच प्रकारे यवतमाळ शहरात एसबीआय बँकेच्या दोन एटीएम मशीनमध्ये चोरट्यांनी छेडछाड करत यातून साधारण सव्वा लाख रुपयांची रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. मशीनमध्ये छेडछाड करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. 

यवतमाळ येथील चिंतामणी ट्रॅव्हल्स पॉइंटसमोरील आणि उमसरा परिसरातील एस.बी.आय.ची दोन एटीएममध्ये छेडछाड करण्यात आली आहे. बसस्थानक चौकापासून हाकेच्या अंतरावर ट्रॅव्हल्स पॉइंट असून याच परिसरात एस.बी.आय.चे एटीएम केंद्र आहे. या मार्गावर रात्रीही वर्दळ असते. अशा स्थितीत तीन ते चार अनोळखी लोकांनी एटीएममध्ये प्रवेश करून मशिनमध्ये छेडछाड केल्याचे दिसून येत आहे. 

सव्वा लाखाची रोकड लांबविली 

चोरट्यांनी दोन एटीएम मशीन लक्ष केले होते. यातील ट्रॅव्हल्स पॉईंट येथील एटीएम मशिनमधून एक लाखाच्या रकमेची चोरी केली. तसेच उमरसरातील एस.बी.आय. शाखेच्या एटीएम केंद्रातही चोरट्यांनी १४ हजार २०० रुपये अशी एकूण १ लाख १४ हजार २०० रुपयांची रोकड लंपास केली आहे. दरम्यान चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून त्या आधारे पोलीसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.  

करमाळ्यात अवैध देशी विदेशी दारू जप्त
पंढरपूर : अवैध देशी विदेशी दारूची वाहतूक करणारे वाहन पकडून करमाळा पोलिसांनी कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान ४७ हजार रूपयांचा विविध कंपन्याचा अवैध देशी‌ विदेशी दारूसाठा व गाडी असा एकूण पाच लाख ४७ हजार रूपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी माढा येथील सदाशिव अजय मराठे (वय २८) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pooja Sawant Mangalsutra: मराठमोळा साज! हे आहेत लेटेस्ट ट्रेडिंग लांब मंगळसूत्राचे पॅटर्न

Yuzvendra And Dhanashree: डिव्होर्सनंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा येणार एकत्र; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव, बहीण-भाऊ अन् बापाचा होरपळून मृत्यू, गाढ झोपेत असतानाच....

Maharashtra Live News Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Krantijyoti Vidyalay Collection : 'क्रांतीज्योती विद्यालय...' बॉक्स ऑफिसवर सुसाट, अमेय वाघच्या चित्रपटानं आठवड्याभरात कमावले तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT