यवतमाळमध्ये गुप्तधनासाठी अघोरी पूजा केली जात असल्याचं उघडकीस आलं
मध्यरात्री पोलिसांचा छापा, सहा जणांना अटक
काळ्या जादूच्या साहित्याचा वापर
संजय राठोड, साम प्रतिनिधी
भोंदू बाबाकडून लूट झाल्याचे प्रकार समोर येत असताना यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुप्तधन मिळवण्यासाठी यवतमाळच्या वडगावमध्ये अघोरी पूजा केली जात होती. ही पूजा पोलिसांनी उधळून लावली आहे. याप्रकरणी वडगाव जंगल पोलिसांनी सहा अटक केली आहे. वडगाव शिवारात मोटार पंप चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने ठाणेदार विकास दांडे पथकासह आडवळणाच्या रस्त्याने गस्त घालत असताना वरूड-कारेगाव रस्त्यावर हा प्रकार उघडकीस आला.
राज्यात अंधश्रद्धेचा बाजार फुलला असल्याचं चित्र आहे. नाशिक-संगमनेरमधील भोंदूबाबांचे प्रकरणं समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. गुप्तधन मिळवण्यासाठी यवतमाळमधील वडगावतात अघोरी पुजा केली जात होते. गस्त घालणाऱ्या पोलिसांनी ही पूजा उधळून लावण्यात आली आहे. पोलिसांच्या पथकाला वरूड ते कारेगाव मार्गावर संशयास्पद स्थितीत (एमएच ०१ बीएफ ६०२६) क्रमांकाचे वाहन उभे दिसले.
पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अघोरी पूजेशी संबंधित विविध साहित्य आढळून आले. यामध्ये कुदळ, अगरबत्ती, ज्वारीचे पीठ, काळ्या बाहुल्या, त्रिशूल, रुद्राक्ष माळ, लिंबू, केस, सुया, ताबीज, रंगीबेरंगी धागे आदी वस्तूंचा समावेश होता. या साहित्याच्या आधारे संशयित सहा जणांची चौकशी केली असता त्यांनी जमिनीतून गुप्तधन काढण्यासाठी शिवारात आलो असल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी अशोक रामधन राठोड (५० रा. हरदा, ता.मानोरा, जि.वाशिम), रितेश रवी भगत (१९, रा. आमगव्हाण, ता. मानोरा, जि. वाशिम), लीलेश्वर विश्वनाथ बावणे (२६, रा. कारखेडा, ता. मानोरा, जि.वाशिम), कुंदन दारासिंग राठोड (२८, रा. वाई गौळ, ता.मानोरा, जि.वाशिम), वीरेंद्र रमेश गायकवाड (३५, ) केशव राठोड (५०, रा. बोरगाव, ता. आर्णी) यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ अंतर्गत कलम ३ (१) (२) (३) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.