Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या १४ बैलाची सुटका; जालन्यात कारमधून गायीची चोरी

Yavatmal Jalna News : यवतमाळच्या वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गवर पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांचा ट्रक पकडला. ट्रकमध्ये वाहतूक केल्या जाणाऱ्या १४ जातीच्या बैलाची सुटका केली

Rajesh Sonwane

संजय राठोड/ अक्षय शिंदे 
यवतमाळ/ जालना
: मुक्या जनावरांची अवैधपणे गाड्यांमध्ये भरून वाहतूक करत कत्तलीसाठी नेण्यात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत १४ बैलांची सुटका करण्यात आली आहे. तर दुसरीकडे जालना जिल्ह्यात इनोव्हा कारमधून रात्रीच्या वेळी गायीची चोरी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.   

यवतमाळच्या वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर पोलिसांनी केलेल्या कारवाईत कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांचा ट्रक पडला आहे. या ट्रकमध्ये अमानुषपणे वाहतूक केल्या जाणाऱ्या १४ जातीच्या बैलाची सुटका केली आहे. या तर या कारवाईमध्ये पोलिसांनी जनावरांसह २० लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. ही कारवाई किन्ही जवादे येथील राजस्थानी ढाब्याजवळ करण्यात आली असून नागपूर वरून तेलंगणा राज्यात कत्तलीकरिता जनावरे घेऊन जात होते.

जालन्यात कारमधून गायीची चोरी
जालना
: जालना शहरातील नवीन मोंढा भागातील रॉयल नगर येथून कारमधून गायीची चोरी केयी जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. इनोव्हा गाडीतून गायीची चोरी केल्याची घटना समोर आलीय. जालना शहरातील नवीन मोंढा भागातील रॉयल नगर येथे ही घटना घडली असून हा संपूर्ण प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

गायीला डिक्कीत कोंबून फरार 

गाडीतून आलेल्या दोघांनी रॉयल नगर येथे आपली गाडी थांबवली. यावेळी त्यांनी एका गायीला गाडीच्या मागील डीक्कित कोंबले आणि ते तिथून फरार झाले. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून या संपूर्ण घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. तर गायीची चोरी करणाऱ्या चोरांवर पोलिस आता काय कारवाई करतात? हे बघणे आता महत्त्वाचे असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा अजित पवारांना दे धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Shukra Gochar 2026: 12 महिन्यांनी शुक्र करणार शनीच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Best Sleeping Time: वयानुसार तुम्ही किती तास झोपले पाहिजे? जाणून घ्या

Parth Pawar: कुणी चुकीचे काम करत असेल तर...; पार्थ पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Janhvi Kapoor: वेडिंग सीझनसाठी परफेक्ट आहे जान्हवीचा 'हा' लूक तुम्हीही करु शकता रिक्रिएट

SCROLL FOR NEXT