Onion Price : कांद्याला विक्रमी बाजारभाव; पुण्याच्या खेड तालुक्यातील शेतकरी लखपती

Pune Khed News : यंदाच्या कांदा हंगाम शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरत असुन प्रति १० किलोला ३२५ रुपयांचा बाजारभाव मिळत असुन उत्पादनही चांगलं मिळत असल्याने शेतक-यांना कांद्याने आधार दिला आहे
Onion Price
Onion PriceSaam tv
Published On

खेड (पुणे) : मागील महिन्यात कांद्याचे दर कमी होत होते. यामुळे शेतकरी संकटात सापडला होता. मात्र आता पंढरवाड्यापासून कांद्याच्या दरात वाढ होण्यास सुरवात झाली आहे. सध्या कांद्याला विक्रमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे. कांद्याचे भाव वाढल्याने पुण्याच्या खेड तालुक्यातील शेतकरी लखपती झाला आहे. साधारण सात एकरमध्ये २५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. 

मागच्या काही दिवसापासुन आवकाळी पाऊस, वातावरणातील बदलामुळे रोगराई आणि कवडीमोल मिळणारा बाजारभाव यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला होता. मात्र यंदाच्या कांदा हंगाम शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरत असुन प्रति १० किलोला ३२५ रुपयांचा बाजारभाव मिळत असुन उत्पादनही चांगलं मिळत असल्याने शेतक-यांना कांद्याने आधार दिला आहे. मात्र शेती करत असताना उत्तम नियोजनाची गरज असल्याचे शेतकरी सांगतात. 

Onion Price
Ujani Dam : उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग; सोलापूर शहरातील सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी निर्णय

२५ लाखांचे उत्पादन 

मागच्या पाच वर्षापासुन कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते. मात्र आता याच कांद्याने शेतकऱ्यांना आधार दिला असुन सध्या कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळत आहे. चांगला भाव असल्याने खेड तालुक्यातील किवळे येथील शेतकरी संतोष कड यांना सात एकरात २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने शेतकरी आनंदी आहे. 

Onion Price
Amravati Corporation : थकित मालमत्ता कर धारकावर आजपासून जप्तीची कारवाई; अमरावती महानगरपालिका ॲक्शन मोडवर

कांद्याच्या भावात सुधारणा 

कांदा काढणी सुरवात झाल्यानंतर सुरवातीला पाहिजे तसा भाव मार्केटमध्ये मिळत नव्हता. मात्र मागील पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. कांद्याला सरासरी ३ हजार रुपयांच्या वर भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी सुखावला आहे. अर्थात आवक कमी आणि मागणी अधिक असल्याने भाव वाढत आहेत. आगामी काळात कांद्याच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com