Ujani Dam : उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग; सोलापूर शहरातील सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी निर्णय

Pandharpur News : राज्यात यंदा चांगला पाऊस झाला. यामुळे राज्यातील बहुतांश धरणात मुबलक पाणीसाठा आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात देखील मुबलक पाणीसाठा असून धरणातील पाण्यामुळे सोलापूर शहरवासीयांची तहान भागते
Ujani Dam
Ujani DamSaam tv
Published On

पंढरपूर : यंदा चांगला पाऊस झाल्याने उजनी धरणात मुबलक असा पाणी साठा साचला आहे. दरम्यान सोलापूर शहराला भीमा नदीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र नदी पात्रातील पाणी आटले असल्याने सध्या सोलापूर शहरासह आजूबाजूच्या गावांना पाणी समस्या भेडसावू लागली आहे. या अनुषंगाने सोलापूर शहरासह भीमा नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी आजपासून उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे.

राज्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील बहुतांश धरणात मुबलक असा पाणी साठा झाला आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात देखील मुबलक पाणी साठा असून या धरणातील पाण्यामुळे सोलापूर शहरवासीयांची तहान भागत असते. दरम्यान भीमा नदी आता कोरडी पडल्याने सोलापूर शहराला होणार पाणी पुरवठा कमी दाबाने करावा लागत आहे. शिवाय आगामी काळात पाणी समस्या अधिक जाणवू नये यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. 

Ujani Dam
Nagpur Crime : ब्रँडेड कंपनीचे स्टिकर लावून खुल्या तेलाची विक्री; नागपुरातील धक्कादायक प्रकार, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

१६०० क्युसेकने सोडले पाणी 

सध्या सोलापूर शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला‌ जातो. पुढे उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे पाणी संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. आगामी काळातील पाणी टंचाई विचारात घेऊन उजनी धरणातून भीमा नदीद्वारे पाणी सोडले आहे. आज धरणातून १६०० क्युसेक इतके पाणी सोडले आहे. यामुळे नदीद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठा सुरळीत राहू शकेल. 

Ujani Dam
Accident News : दुचाकीस्वाराला वाचविण्यात कार पलटी; पाच जण जखमी

नागरिकांना सतर्कतेचा इशारा 
धरणातून पाणी सोडण्यात आल्याने भीमा नदीला पूर आला आहे. यामुळे नदी काठच्या सर्व नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील शेती पंप, नदीकाठच्या शेती, अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ काढण्याच्या सूचना ही पाटबंधारे विभागाने दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com