Roshani Zade, Yavatmal Crime News, Yavatmal Latest Marathi News Saam Tv
महाराष्ट्र

पतीच्या निधनानंतर पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; ९ महिन्यांची चिमुकली थोडक्यात बचावली

दोन महिन्यांपूर्वी रोशनीच्या पतीचे निधन झाले होते

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

यवतमाळः चार महिन्यापूर्वी अन्नातून झालेल्या विषबाधेने पतीचा अचानक मृत्यू झाला. पण तिला पतीचा मृत्यू मान्यच झाला नाही. यातूनच २५ वर्षीय महिलेने आपल्या नऊ महिन्यांच्या चिमुकलीसह आत्महत्या करण्यासाठी साडीचा फास तयार केला. या धक्कादायक घटनेत आईचा मृत्यू झाला असून सुदैवाने फास सुटल्याने चिमुकलीचे प्राण वाचले. (Yavatmal Latest Marathi News)

अंगावर काटा आणणारी ही धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे उघडकीस आली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. रोशनी आशिष झाडे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. रोशनी हिचा काही वर्षांपूर्वी हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर येथील आशिष झाडे यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना एक कन्यारत्नही प्राप्त झाले.

सर्व काही सुरळीत सुरू असताना, दोन महिन्यांपूर्वी आशिष यांना अन्नातून विषबाधा झाला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. पतीच्या अचानक निधनामुळे रोशनीवर दु:खाचा डोंगर कोसळला. पोटच्या चिमुकलीला घेऊन जगायचं कसं असा प्रश्न तिला पडला. त्यामुळे रोशनी तिच्या मार्डी येथील माहेरी आली होती.

मंगळवारी (७ जून) रोशनीचे वडील हे कामानिमित्त बाहेर गेले होते. तर आई घराबाहेर होती. ही संधी साधून रोशनीने तिच्या ९ महिन्याच्या चिमुलीसह गळफास लावून घेतला. यामध्ये रोशनीचा मृत्यू झाला तर चिमुकलीचा फास सुटल्याने ती थोडक्यात बचावली. काही वेळाने ही घटना उघडकीस आली.

दरम्यान, रोशनी हिच्या बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता ते बाळ सुखरुप आहे. मात्र, अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत आई आणि वडिलांचे छत्र हरवल्याने ९ महिन्यांची चिमुकली पोरकी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

SCROLL FOR NEXT