Yavatmal Crime saam tv
महाराष्ट्र

Crime : बांबूची काठी डोक्यात घातली, जीवघेणा हल्ला केला; लहान भावाकडून मोठ्या भावाची निर्घृण हत्या

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये लहान भावाने मोठ्या भावाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपी लहान भाऊ मानसिक रुग्ण असल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Yash Shirke

  • यवतमाळच्या माळकिन्ही गावात लहान भावाने मानसिक असंतुलित अवस्थेत मोठ्या भावाची शेतातच निर्दयपणे हत्या केली.

  • आरोपी प्रदीप रिंगेने बांबूच्या काठीने तोंडावर व डोक्यावर हल्ला करून भावाचा जागीच मृत्यू घडवला.

  • पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेने गावात भीती व शोककळा पसरली आहे.

संजय राठोड, साम टीव्ही, प्रतिनिधी

Yavatmal : यवतमाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील माळकिन्ही या गावामध्ये सख्ख्या भावांमध्ये घडलेल्या भीषण घटनेने गाव हादरले आहे. मानसिक असंतुलित असल्याचा संशयित लहान भावाने स्वतःच्या मोठ्या भावाचा शेतातच निर्दयपणे जीव घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

आरोपी प्रदीप अशोक रिंगे (वय ३० वर्ष रा. माळकिनी ता. महागाव) याने रात्री अकराच्या सुमारास त्याचा मोठा भाऊ मृतक निलेश अशोक रिंगे (वय ३५ वर्ष) याच्या डोक्यावर, तोंडावर बांबूने काठीने मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या निलेशचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपी प्रदीपला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर निलेशचा मृतदेह सोना ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

आरोपी प्रदीप गेल्या काही काळापासून मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची चर्चा घटनेनंतर दबक्या आवाजात सुरू आहे. अचानक झालेल्या रागाच्या भरात त्याने हातात बांबूची जाड काठी घेतली व शेतात काम करीत असलेल्या मोठ्या भावावर तुटून पडला. त्याने मृतक निलेशच्या डोक्यावर व तोंडावर बेछूट प्रहार केले. काही क्षणांतच निलेश गंभीर जखमी झाला व जमिनीवर कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर शेताजवळील शेजारी व गावकरी घटनास्थळी धावले. मात्र तोपर्यंत निलेशचा मृत्यू झाला होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत गावातून अटक केली. याप्रकरणी महागाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर माळकिन्ही गावात शोककळा पसरली आहे. दिवसा-ढवळ्या सख्ख्या भावानेच भावाचा जीव घेतल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती व हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai : अलिबाग, गोव्यापेक्षाही सुंदर आहे नवी मुंबईतील 'हा' समुद्रकिनारा

T20 World Cup 2026 Schedule : टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर; या दिवशी होणार क्रिकेटच्या महाकुंभमेळ्याला सुरुवात, रोहित शर्माकडं मोठी जबाबदारी

Green Chili Pickle: गावरान पद्धतीने बनवा हिरव्या मिरचीचं लोणचं, वर्षानुवर्षे टिकून राहील चव

Maharashtra Live News Update : महात्मा फुलेवाडा आमच्या ताब्यात द्या; राज्य सरकारला समता परिषदेचे पत्र

Shocking : लग्नाला सुट्टी मिळाली नाही; लग्नाच्या एक दिवसाआधी ऑडिटरने आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT