खेळता खेळता घराशेजारी उभ्या असलेल्या कारमध्ये गेलेल्या चार वर्षी चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झालाय...कारचा दरवाजा लॉक झाल्यानं आणि बराचवेळ आत अडकल्यानं श्वास गुदमरून अंश केळझरकर या मुलाचा यवतमाळच्या चिखलवर्धा गावात मृत्यू झालाय. अशातच प्रशासकीय यंत्रणेचा गलथान कारभारही या घटनेनंतर समोर आलाय...नेमकं काय घडलं...पाहूयात...
कारमध्ये लॉक झाल्यानं जीव गेला
खेळताना 4 वर्षांचा अंश केळझरकर शेजारच्या बंद कारमध्ये गेला आणि आतच अडकला
उन्हामुळे बंद कारमध्ये बराच वेळ राहिल्यानं अंशचा श्वास गुदमरला
नातेवाईकांनी तातडीनं घाटंजी रुग्णालयात नेलं मात्र वेळेवर ऑक्सिजन आणि रुग्णवाहिका न मिळाल्याचा आरोप
सामाजिक कार्यकर्त्यांच्या रुग्णवाहिकेनं उपचारासाठी अंशला यवतमाळला हलवलं
यवतमाळ इथं उपचारादरम्यान चिमुकल्या अंशचा मृत्यू
दरम्यान या घटनेनंतर ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आलाय...अंशचे वडील रोजमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. घरातल्या एकुलत्या एका लहान मुलाच्या अशा अकाली मृत्यूने त्या गरीब आई-वडिलांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र पालकांनीही आपल्या मुलांची काळजी घ्यायला हवी...उन्हाळ्यात लहान मुलांना खेळताना धोकादायक ठिकाणी जात नाहीत ना? याची खबरदारी घ्यायला हवी... अन्यथा एक चुक घरातल्या लहान मुलांच्या जीवावर बेतू शकते...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.