Disciplinary action taken against students involved in ragging at an Ayurvedic college in Yavatmal after a UGC helpline complaint. Saam tv
महाराष्ट्र

UGC कडे तक्रार अन् आयुर्वेद कॉलेजमधील 18 विद्यार्थ्यांचं निलंबन; नेमकं प्रकरण काय?

Yavatmal Ayurvedic College Ragging Case Details: यवतमाळमधील आयुर्वेदिक महाविद्यालयात रॅगिंग प्रकरण उघडकीस आले असून 18 विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. यूजीसी अँटी रॅगिंग हेल्पलाइनवर तक्रार होताच प्रशासनाने तत्काळ चौकशी करून निलंबन, दंड आणि रस्टिकेशनची कारवाई प्रस्तावित केली आहे.

Omkar Sonawane

संजय राठोड, साम टीव्ही

यवतमाळ: आयुर्वेदिक प्रथम वर्षात नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची रॅगिंग घेतल्याप्रकरणी यवतमाळ येथील डायाभाई मावजी मजीठिया आयुर्वेदिक महाविद्यालयातील 18 विद्यार्थ्यावर कारवाई निश्चित करण्यात आली आहे एका विद्यार्थ्याला एक वर्षाकरिता महाविद्यालयातून. रस्टीकेट केले जाणार आहे तर आठ विद्यार्थ्यांना सहा महिन्याकरिता तर आठ विद्यार्थ्यांन वर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात प्रस्तावित करण्यात आले आहे तर तिघांना समज देण्यात आली आहे.

शिवीगाळ करणे कामे करून घेणे लिहून मागणे रूमवर बोलविणे यासह आदी प्रकारे रॅगिंग केली जात होती. दरम्यान या प्रकरणी वरिष्ठ विद्यार्थ्यांनी रॅगिंग घेतल्याची तक्रार बी ए एम एस प्रथम वर्षातील नवीन विद्यार्थ्यांनी यूजीसी अँटी रॅगिंग हेल्पलाइन न्यू दिल्ली या वेबसाईटवर केली होती जवळपास 21 विद्यार्थ्यांनी रॅगिंग घेतल्याचे त्यांनी या तक्रारीत नमूद केले.

याप्रकरणी केलेल्या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना यूजीसी अँटी रॅगिंग हेल्पलाइन न्यू दिल्ली आणि अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने महाविद्यालयाला देण्यात आल्या होत्या यानुसार महाविद्यालयात अँटी रॅगिंग कमिटीची बैठक घेण्यात आली आणि या बैठकीत रॅगिंग घेतल्याचे स्पष्ट झाल्याने समितीने त्यांच्यावर कारवाई निश्चित केली आहे. यामध्ये आठ विद्यार्थ्यांना सहा महिन्याकरता महाविद्यालयातून रस्टीकेट केले जाईल तर आठ विद्यार्थ्यांना दंड ठोठावण्याचे प्रस्तावित आहे अशी माहिती महाविद्यालयाच्या वरिष्ठांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत खळबळ! वाढदिवसाचा केक खाल्ल्याने ११ जणांना विषबाधा; ७ अल्पवयीन मुलांचा समावेश

Shravan Somvar : १६ सोमवार केल्याने काय पुण्य मिळते; जाणून घ्या मुली हा उपवास का करतात

Samosa Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी झटपट घरीच बनवा कुरकुरीत आणि चविष्ट समोसा; वाचा सोपी रेसिपी

Bathing after eating: भरपेट जेवणानंतर लगेच अंघोळ केल्यास शरीरात हे 2 बदल जाणवू शकतात!

Maharashtra News Live Update: नाशिक CBS परिसरात बसमध्ये चढण्यावरून तरुणांमध्ये राडा

SCROLL FOR NEXT