Car Accident Saam tv
महाराष्ट्र

Car Accident : प्रयागराजवरून परतताना काळाचा घाला; कारची टँकरला धडक, महिलेचा मृत्यू, मुलगा गंभीर

Yavatmal News : नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग वरील यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील सुकळी जवळ हा अपघात झाला. यात चिखली धाडेश्वर (जि. धाराशिव) येथील विमल बालचंद्र महामुने (वय ६७) यांचा जागीच मृत्यू झाला

Rajesh Sonwane

संजय राठोड
यवतमाळ
: उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरलेला आहे. याठिकाणी शाहीस्नान करण्यासाठी भाविक जात आहेत. त्यानुसार धाराशिव येथील परिवार प्रयागराजला गेले होता. तेथून परत येत असताना यवतमाळच्या आर्णी तालुक्यात या परिवाराच्या कारला अपघात झाला. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. 

नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग वरील यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील सुकळी जवळ हा अपघात झाला. यात चिखली धाडेश्वर (जि. धाराशिव) येथील विमल बालचंद्र महामुने (वय ६७) यांचा जागीच मृत्यू झाला. तर राहुल बालचंद्र महामुने (वय ३५) असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव असून इतर दोन महिला व एक पुरुष किरकोळ जखमी झाले आहेत. 

प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्यांची ओघ सुरु आहे. अंतिम टप्प्यात आलेल्या महाकुंभमेळ्यातील शेवटचे शाहीस्नान पुढील आठवड्यात होणार आहे. यामुळे भाविक आता मोठ्या संख्येने प्रयागराजला जात आहेत. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील महामुने परिवार प्रयागराजला गेला होता. त्याठिकाणाहून परतताना त्यांच्या कारने समोर जाणाऱ्या टँकरला मागून जबर धडक दिल्याने हा अपघात झाला. 

मृतक महिला ही आपल्या परिवारा सोबत धाराशिव येथून प्रयागराजला महाकुंभमेळ्यात गेली होती. कुंभमेळ्यातून परत आर्णी मार्गे धाराशिव (उस्मानाबाद) कडे जात असताना आर्णी तालुक्यातील सुकळी जवळ यवतमाळ वरून माहूरच्या दिशेने जाणाऱ्या टँकरला कारने जबर धडक दिली. यात कारमधील ६७ वर्षीय महिला ही जागीच ठार झाली. तर त्याचा ३५ वर्षीय मुलगा हा गंभीर जखमी झाला आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Maharashtra News Live Update: वर्ध्याच्या जळगाव परिसरात बिबट्याची दहशत; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT