yashwantrao chavan samadhi sthal inspiration for us says ajit pawar  saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar : यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ उर्जा व प्रेरणा स्त्रोत : अजित पवार

yashwantrao chavan jayanti : दिल्लीतील यशवंतराव चव्हाण यांचे घर उभ्या महाराष्ट्राला आपलसं वाटत होते, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कराड येथे नमूद केले.

Siddharth Latkar

Satara News :

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण (yashwantrao chavan) यांचे प्रितीसंगमावरील समाधीस्थळ उर्जा व प्रेरणा स्त्रोत आहे. शासनाच्या माध्यमातून लोकहिताचे काम करीत असताना असे उर्जा व प्रेरणा स्त्रोत सहायभूत ठरतात. महाराष्ट्राच्या जडण घडणीत यशवंतराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यामुळे आज महाराष्ट्र कृतिशील व प्रगल्भ महाराष्ट्र घडला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी केले. (Maharashtra News)

सातारा जिल्ह्यातील कराड येथे आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानतर्फे (कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींची शब्द सुरांची भावपूर्ण आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित हाेते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुनिल तटकरे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले (कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या कामामुळेच शेती, व्यापार, आरोग्य, शिक्षण, सहकार यासह अनेक क्षेत्रात महाराष्ट्राचा पाया भक्कम उभा आहे. राजकारण, समाजकारण त्यांनी वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले.

त्यांची नाळ शेवटपर्यंत जनतेशी जोडली गेली होती. राजकारणावर त्यांचा वेगळा ठसा व प्रभाव होता. दिल्लीतील त्यांचं घर उभ्या महाराष्ट्राला आपलसं वाटत होते, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Raj & Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचा नवा टीझर; मराठी अस्मितेचा बुलंद आवाज पुन्हा दुमदुमला|VIDEO

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

SCROLL FOR NEXT