Mla yashomati thakur
Mla yashomati thakur saam tv
महाराष्ट्र

Yashomati Thakur News: "लाव न बे ईडी, हिम्मत असेल तर"; यशोमती ठाकूर यांचं सत्ताधाऱ्यांना ओपन चॅलेंज

Ruchika Jadhav

अमर घटारे

Maharashtra Political News:

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रम असल्याचं दिसत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षातील काही आमदार आणि नेते भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. मात्र, हे सर्व सत्ताधाऱ्यांनी ईडीची चौकशी लावल्याने होत असल्याचा आरोप विरोधक करतायत. यामध्ये आमदार यशोमती ठाकूर यांनी भाजपला ओपन चॅलेंज केलं आहे. (Latest Marathi News)

काँग्रेसच्या नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत एका कार्यक्रमात भाजपला लक्ष केलं. यावेळी त्या म्हणाल्या की, "लाव न बे ईडी हिम्मत असेल तर लाव ईडी. मायभिन तुले बिलकुल लाव ईडी. बघतो काय निघते तर माझ्यावर ईडी लावण्यासाठी निवेदन देण्यात आलं असा गौप्यस्फोट त्यांनी करत सत्ताधाऱ्यांना ईडी संदर्भात खुल चॅलेंज दिलंय.

दरम्यान, यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यानंतर खळबळ उडाली आहे. माझ्यावर ईडी लावण्यासाठी निवेदन देण्यात आल्याचा गौप्यस्फोट देखील त्यांनी यावेळी केला. आतापर्यंत विरोधी पक्षांतील अनेक राजकीय नेत्यांवर ईडीची चौकशी लावण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राष्ट्रवादीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. मात्रनंतर अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्ये देखील फूट पडणार अशी चर्चा देखील सध्या सुरू आहे. मात्र अशी अफवा भाजप जाणीवपूर्वक पसरवत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates : पुण्यातील दिवेघाटात भरदिवसा बिबट्याचे दर्शन; VIDEO व्हायरल

Mumbai University Recruitment: मुंबई विद्यापीठात विविध पदांसाठी भरती;मिळणार ४० हजार रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Nora Fatehi: लाल रंगाच्या घागऱ्यात खुललं 'नोरा'चं सौंदर्य, फोटो पाहिलेत का?

Manoj Jarange Patil News | जरांगेंसहीत मराठ्यांचं भगव वादळ हिंगोलीत दाखल..

Ind vs Zim Playing XI : झिम्बाब्वेविरुद्ध अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग ११; शुभमन गिलनं ३ खेळाडूंची नावेही सांगितली

SCROLL FOR NEXT