Yashomati Thakur News Saam TV
महाराष्ट्र

Yashomati Thakur News: ...तर पक्षाचा परफॉर्मन्स आणखी वाढेल; काँग्रेसच्या अंतर्गत वादावर यशोमती ठाकूर यांचं सुतोवाच

माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया देत सुतोवाच केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Political News: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेसचा एक गट पक्षश्रेष्ठींकडे गेला आहे. नाना पटोले यांच्या विषयी काही तक्रारी यावेळी करण्यात आल्या आहेत. या सर्वांमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अशात आता माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया देत सुतोवाच केलं आहे. (Latets Marathi News)

प्रदेशाध्यक्ष श्रेष्ठ असतात त्याबाबत आपल्याला बोलायचे नाही. मात्र येवढेच आहे की सर्वांना मिळवून घेतले तर पक्षाचा आणखी परफॉर्मन्स वाढेल, अशी सूचक प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी काँग्रेसच्या अंतर्गत वादावर दिली आहे.

पटोले यांना अध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी

नाना पटोले यांना हटवण्याची विनंती केली जात आहे. यासाठी राज्यातील माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम, राष्ट्रीय सचिव शिवाजीराव मोघे यांच्यासह अनेक नेते दिल्लीत दाखल झालेत. येथे त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व काँग्रेस (Congress) यांच्या कार्यकारिणीचे गठण झाल्यावर तातडीने महाराष्ट्राबाबत विचार केला जाईल आणि योग्य तो निर्णय देण्यात येईल, असं काँग्रेस अध्यक्षांनी म्हटलं आहे. काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या या अंतर्गत वादाचा शेवट काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न; घरी बोलावून शेतकऱ्याचं सोडवलं उपोषण

Thackeray vs Shinde: शिंदे 'नरकासूर'; नरक चतुर्दशीवरून उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर विखारी टीका

नवी मुंबईत पालिका निवडणुकीआधी शरद पवार गटात नाराजी उफाळली; आधी बंडखोरी, आता आमलेंना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Bacchu Kadu: आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा; बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT