Yashomati Thakur , Amravati , Eknath Shinde , Devendra Fadnavis , Rain Saam Tv
महाराष्ट्र

Yashomati Thakur : शिंदे- फडणवीस यांचं Power Hungry सरकार

आंदाेलकांनी जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती : सरकार स्थापन होऊन एक महिना झाला आहे. अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना मंत्रिमंडळ नेमायची डेरिंग नाही. संपूर्ण राज्यांतील (maharashtra) सर्व जिल्ह्यात पालकमंत्री विना पाेरके झालेत. संपूर्ण राज्य दोन मंत्री चालवत आहे. राज्यातील जनतेचं सरकार मायबाप असते मात्र या सरकारचा अजूनही ठाव ठिकाणा नाही. महाराष्ट्र बेवारास झाला आहे अशी टीका आमदार यशाेमती ठाकूर (yashomati thakur) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारच्या कारभारावर केली. (Yashomati Thakur Latest Marathi News)

अमरावती ग्रामीण काँग्रेसच्या वतीने आज (बुधवार) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यावेळी आमदार यशाेमती ठाकूर या बाेलत हाेत्या. आमदार ठाकूर म्हणाल्या अमरावती जिल्ह्यात तीन लाख हेक्टरच्या वर शेतीचे पावसामुळे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली. काही ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे शेती खरडून गेली तर काही ठिकाणी संपूर्ण संपूर्ण शेती पाण्याखाली आल्यामुळे शेतकऱ्यांचं कापूस, तूर, सोयाबीन पिकाचे मोठं नुकसान झालं आहे. (Amravati News)

राज्य सरकार (दोन मंत्र्यांचं) शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे असे सांगून ठाकूर यांनी अमरावतीच्या संपूर्ण जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. यावेळी आमदार ठाकूर यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. त्यानंतर आंदाेलकांनी जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाकिस्तानी गँगस्टर शहबाज भट्टीसोबत लिंक असल्याच्या माहितीवरून दहा तरुणांना नागपूर ATS ने घेतलं ताब्यात

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

स्मार्ट मीटर बसण्यापूर्वीच ४४० व्होल्टचा झटका; पाठवलं ५ महिन्यांचं वीजबिल, धक्कादायक प्रकरणाने राज्यात खळबळ

Shocking: नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांची आत्महत्या, चिंचेच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Eknath Shinde : शिवसेनेला खिंडार! एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का, नाराज नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

SCROLL FOR NEXT