wrestler balasaheb gaikwad saam tv
महाराष्ट्र

Kolhapur : वस्ताद बाळ गायकवाड यांचे निधन, मल्ल हळहळले

Kolhapur Kushti News : बाळ गायकवाड यांनी देशातील प्रतिष्ठित मानले जाणारे पुरस्कार नाकारले. तसेच कोणत्याही प्रसिद्धीपासून ते कायम अलिप्त राहिले.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे संस्थापक (kolhapur jilha rashtriya talim founder) व असंख्य कुस्तीगिर यांचे मार्गदर्शक वस्ताद बाळ दादा तथा बाळासाहेब राजाराम गायकवाड (wrestler balasaheb gaikwad) यांचे वयाच्या ९० व्यावर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ, राज्य आणि देशातील असंख्य मल्ल एका कुस्ती मार्गदर्शकास मुकल्याची भावना समाज माध्यमातून व्यक्त करु लागले आहेत. (Maharashtra News)

सन १९६०च्या दरम्यान माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे व बाळ गायकवाड यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना करून कुस्तीगीरांचे संघटन करून पैलवान आणि तालमींना कुस्ती पेशा वाढविण्यासाठी सहकार्य केले. आजही बाळ दादा हे कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे चीफ पेट्रन म्हणून कार्यरत होते.

१९७० ते १९८५सालापर्यंतपश्चिम महाराष्ट्रामध्ये असंख्य कुस्तीगरांच्या या संघटनेचा प्रचंड मोठा गोतावळा व आदर युक्त दबदबा होता. त्यांचे समवयस्क हिंदकेसरी गणपत आंदळकर (wrestler ganpat andalkar), मारुती माने (wrestler maruti mane) यांनाही कुस्ती बाबत त्यांचे मार्गदर्शन असायचे. त्याचबरोबर हिंदकेसरी चंबा मुतनाळ, दादू चौगुले, विष्णू जोशीलकर निग्रो बंधू यांच्यासह आज अखेरच्या अनेक नामांकित मल्लांना त्यांचे कुस्ती साठी व्यायामापासून आहारापर्यंत सर्व मार्गदर्शन असायचे.

१९ ७७च्या दरम्यान उत्तरे कडीलविशेष करून गुरु हनुमान सिंग यांच्या पैलवानांचे कोल्हापूरकरांना कुस्तीसाठी वारंवार आव्हान असायचे. कोल्हापूरकरांच्या बरोबर बाळ दादांनाही मोठी बोचणी होती म्हणून त्यांनी अतिशय लहान वयामध्ये कोपार्डे येथील लहान शाळकरी मुलगा युवराज पाटील यांना आणून आपल्या स्वतः बरोबर ठेवून एक महाबली पैलवान तयार केला आणि उत्तरेकडील मल्लांचे आव्हान परतवून लावले.

भारताचा सर्वश्रेष्ठ मल्ल युवराज पाटील हे सिद्ध केले. लोकांनीच युवराज पाटील यांना भारत देशामध्ये कोणीच प्रतिस्पर्धी मल्ल राहिला नाही म्हणून कुस्ती सम्राट ' 'ही पदवी लोकांनीच दिली. बाळ गायकवाड यांनी सदैव तालीम संघामध्येच वास्तव्य ठेवून आपले सर्वस्व कुस्तीसाठी वाहून घेतले. त्यामुळे त्यांना कुस्तीचे भीष्माचार्य देखील म्हटले जाते. बाळ गायकवाड यांनी देशातील प्रतिष्ठित मानले जाणारे पुरस्कार नाकारले. तसेच कोणत्याही प्रसिद्धीपासून ते अलिप्त राहिले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेहमी तालीम संघाच्या कार्यालयात वास्तव्यास असणाऱ्या बाळ दादांना आता दगदग नको म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी पुनाळ या त्यांच्या जन्म गावी घेऊन गेले. तेथेही ते घरी न राहता कुटुंबाचा त्याग करून शेती आणि गु-हाळ घरावरच राहून कुस्तीचे मार्गदर्शन करत होते. त्याचबरोबर शेतीतील पिकांची वेगवेगळे प्रयोग करून शेती करत होते. त्यांच्या निधनाने कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ आणि राज्य आणि देशातील असंख्य मल्ल एका कुस्ती मार्गदर्शकास मुकल्याची भावना व्यक्त हाेऊ लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT