Women's demand for water; Government neglect of acute water scarcity
Women's demand for water; Government neglect of acute water scarcity दिनू गावित
महाराष्ट्र

Nandurbar : पाण्यासाठी महिलांची वणवण; तीव्र पाणीटंचाईकडे प्रशासनाचं दुर्लक्ष

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार: धडगाव तालुक्यातील गोरंबा ग्रामपंचायतमधील लहान गावठाण पाडा, मोठे गावठाणपाडा, मोवडाबीपाडात (Nandurbar) राहणाऱ्या नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिसरात जवळपास नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना नैसर्गिक झऱ्यावर अवलंबून राहावे लागते. (Women's demand for water;Government neglect of acute water scarcity)

हे देखील पाहा -

जवळपास तीन हजार पेक्षा अधिक नागरिक असलेल्या या पाड्यांवर मे महिन्याच्या अखेरीस देखील प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची सुविधा (Water Crisis) करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना डोंगरदऱ्यात असलेल्या नैसर्गिक झऱ्यातून आपली तहान भागवण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. मे महिन्याच्या अखेरीस नैसर्गिक झरे आटत आली असल्याने गढूळ दूषित पाणी पिऊन नागरिकांना तहान भागवावी लागत आहे.

गोरंबा गावात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून नळपाणी योजना आखण्यात आली मात्र ती योजना कागदावरच राहिली. हातपंपाची सुविधा करण्यात आली आहे. मात्र योग्य ठिकाणी नसल्याने तेही पाण्याअभावी आटले आहेत. जवळपासचे नदी, नाले, विहिरी सर्व कोरड्या पडल्या असून गोरंबा ग्रामपंचायत मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. ग्रामपंचायत मधील सरपंच, सदस्य तसेच जिल्हा परिषद प्रशासनाने गोरंबा ग्रामपंचायत मधील नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crop Loan : वर्धा जिल्ह्यात पीक कर्जासाठी बँकांना ११०० कोटींचे उद्दिष्ट; १० टक्के कर्ज वितरित

Soni Razdan News : आलिया भट्टच्या आईसोबत झाला मोठा स्कॅम, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिला महत्वाचा सल्ला

Rohit Pawar News: 'मतदानाचा परळी पॅटर्न', बीडमध्ये बुथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न, रोहित पवारांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप; VIDEO

Constable Vishal Patil Death Case: विशाल पवार मृत्यू प्रकरणात, शवविच्छेदनातून चक्रावून टाकणारी माहिती उघड

Benifits of Fruit Peel: फळांच्या सालीचे त्वचेसाठी जबरदस्त फायदे; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT