भाजपात सदाभाऊंची अवस्था नटरंगासारखी; राष्ट्रवादीच्या नेत्याची बोचरी टीका

Suraj Chavan On Sadabhau Khot : फडणवीस साहेब तुम्ही परत या, आमची केतकी चितळेसारखी अवस्था झाली असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले होते.
Sadabhau Khot's condition in BJP is like Nataranga
Sadabhau Khot's condition in BJP is like NatarangaSaam Tv

मुंबई: रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप नेते सदाभाऊ खोत यांची अवस्था नंटरंगासारखी झाली आहे अशी बोचरी टीका राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी केली आहे. सूरज चव्हाण म्हणाले म्हणाले की, "सदाभाऊ तुमची अवस्था ही केतकी चितळे सारखी नाही तर...भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागून नटरंगमधल्या अतुल कुलकर्णी सारखी झालीय. आता आम्ही एवढंच म्हणू शकतो गडी चांगला होता." असं खोचक ट्वीट सूरज चव्हाण यांनी केलं आहे. (Sadabhau Khot's condition in BJP is like Nataranga; Criticism of NCP leader suraj chavan)

हे देखील पाहा -

आमची सुद्धा केतकी चितळेसारखी अवस्था : सदाभाऊ खोत

सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेच्या पोस्टमुळे पाटील मेला आहे की नाही हे कळलं असे वक्तव्य खोत (Sadabhau Khot) यांनी केले. जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा या अभियानाचा टेंभुर्णी येथे शुक्रवारी (२० मे) ला प्रारंभ झाला त्यावेळी खोत बोलत होते. फडणवीस साहेब तुम्ही परत या, आमची केतकी चितळेसारखी (Ketaki Chitale) अवस्था झाली असल्याचे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले. त्याच्या या वक्तव्यावरच राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी सदाभाऊंना प्रत्युत्तर दिलंय.

सदाभाऊंनी केलं होतं केतकीचं समर्थन

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या केतकी चितळेचं समर्थन खोत यांनी केलं होतं. सदाभाऊ म्हणाले होते की, केतकीचा मला अभिमान असल्याचे सांगत आहे. केतकी कणखर आहे तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही,तिला मानावे लागेल, न्यायालयात तीने स्वतःची बाजू स्वतः मांडली असं सदाभाऊ म्हणाले होते

Sadabhau Khot's condition in BJP is like Nataranga
उद्धव ठाकरेंचे दाऊद टोळीशी संबंध आहेत का हे स्पष्ट करावं: किरीट सोमय्या

भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी दोन-अडीच वर्षांपुर्वी भाजपात प्रवेश केल होता. त्याच्या अगोदर खोत हे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत होते. त्यानंतर निवडणूकीच्या तोंडावर ते भाजपात गेले होते. त्याचप्रमाणे सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देण्याआधीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी ही प्रक्रिया उरकली होती. "गळ्यात हार घालून सोहळा करण्याची गरज नाही'', असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सदाभाऊ खोत यांची ओळख आता भाजपचे नेते अशी झाली आहे. आता ते भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार आहेत.

Edited by - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com