Crime News Saam tv
महाराष्ट्र

Satara: लाेखंडी पार डाेक्यात घालून नव-याने केला बायकाेचा खून

पाेलीसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा (satara) जिल्ह्यातील नागझरी येथे नव-याने (husband) चारित्र्याच्या संशयावरून बायकाेचा (wife) खून केल्याची घटना आज (साेमवार) घडली. दरम्यान या घटनेची (incident) माहिती मिळताच रहिमतपूर (ता. काेरेगाव) येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा तपास पाेलीस (police) करीत आहेत (satara latest marathi news)

ही घटना आज (साेमवार) सकाळी साडे दहा वाजता घडली. प्राथमिक माहितीनूसार मजूरीच्या कामा निमित्त काही महिन्यांपासून नागझरी येथे नवरा त्याच्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. मिळेल ते काम करुन ताे संसाराचा गाडा हाकत आहे. त्याला आपल्या बायकाेच्या चारित्र्याविषयी संशय निर्माण झाला.

त्यामुळे त्याने आज बायकाेशी वाद घालत तिला ठार मारले. त्यानंतर त्याने स्वतःवर हल्ला चढविला. त्यामुळे ताे गंभीर जखमी झाला. दरम्यान या घटनेनंतर बाबू जाधव यास येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा रहिमतपूर पाेलीस तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT