लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणावर गवगवा झाला असून, तत्कालीन शिंदे सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू केली. यासाठी धुळे जिल्ह्यातून पाचही तालुक्यांमधून ५३४५०८ इतक्या लाडक्या बहिणींनी योजनेसाठी नारीशक्ती या मोबाईल ॲपच्या माध्यमातून, त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांच्या मार्फत ऑफलाईन पद्धतीने भरण्यात आलेल्या फॉर्मच्या माध्यमातून अर्ज दाखल करण्यात आले होते.
या दाखल केलेल्या अर्जामधून ५१३२५९ इतक्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींनी तासनतास रांगेमध्ये उभे राहून आपला अर्ज दाखल केला होता. त्याचबरोबर या योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जुळवाजवळ करण्यासाठी देखील लाडक्या बहिणींची मोठी कसरत झाल्याचे बघावयास मिळाले आहे.
एवढ्या मेहनतिने आपला अर्ज दाखल करून देखील काही तांत्रिक अडचणींमुळे त्याचबरोबर कागदपत्रांच्या त्रुटींमुळे धुळे जिल्हयातील २१२४९ इतक्या महिला या लाभापासून वंचित राहिल्या आहेत. या योजनेमुळे महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात फायदा झाला असून, या योजनेने महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये बसण्यास मोठा हातभार लाडक्या बहिणींचा असल्याचे देखील राज्यकर्त्यांतर्फे स्पष्ट करण्यात येत आहे.
या लाडक्या बहिणींच्या जोरावर राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाले. परंतु अद्यापही लाडक्या बहिणींना या योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दिले जातात. आता या योजनेची रक्कम वाढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.