Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Mazi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना 'या' चुका टाळा; अन्यथा कधीच मिळणार नाहीत पैसे

Mukhyamantri Mazi ladki bahin yojana online apply : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना महिलांनी काही चुका टाळणे गरजेचे आहे. अन्यथा पैसे मिळणार नाही.

Satish Daud

राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहे. योजनेसाठी सरकारकडून काही नियमावली देखील जारी करण्यात आली आहे. काही महत्वाचे निकष देखील ठरवण्यात आले आहेत. दरम्यान, महिलांनी योजनेचा अर्ज भरताना काही चुका टाळणे गरजेचे आहे.

एकदा का अर्ज भरताना चूक झाली, तर ती पुन्हा दुरुस्त करणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे अर्ज भरताना काळजी घेणं गरजेचं आहे. चला तर मग पाहुयात लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा? त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात. तसेच अर्ज करताना कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दल.

लाडकी बहीण योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?

अर्ज भरण्यासाठी महिलांकडे सर्वप्रथम आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. याशिवाय डोमासाईल दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/मतदान कार्ड असणे गरजे आहे. ही कागदपत्रे नसल्यास रेशनकार्ड दिले तरी चालेल. अर्ज करणाऱ्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख पेक्षा जास्त नसावे.

त्यासाठी उत्पन्नाचा दाखल असणे आवश्यक आहे. तसेच बँकेचे पासबुक आणि अर्जदाराचे सही केलेले हमीपत्र हवे. लाभ घेणाऱ्या महिलाचे वय २१ ते ६५ वर्ष असावे. महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरदार अथवा पेन्शन धारक नसावा. तसेच कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर ट्रॅक्टर सोडून चारचाकी वाहन नसावे.

लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना 'या' चुका टाळा

  • घरबसल्या अर्ज भरण्यासाठी मोबाइल अॅप उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

  • अर्ज करत असताना सर्व माहिती व्यवस्थित भरणे गरजेचे आहे.

  • सुरुवातीला तुमची प्रोफाइल अपडेट करून घ्यायची आहे.

  • त्यानंतर चालू मोबाइल क्रमांक नंबर भरायचा आहे. तो चुकल्यास पुन्हा भरता येणार नाही.

  • नगरपंचायत किंवा महानगरपालिकेचा प्रभागाचा पिनकोड अचूक टाकावा लागेल.

  • कोणतीही चुकीची माहिती भरल्यास तुमचे अर्ज बाद केले जाणार आहेत.

  • बँक खात्याची डिटेल व्यवस्थित टाकायची आहे. खाते क्रमांक चुकल्यास तुमचे पैसे दुसऱ्याच्या नावावर जाऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT