Akola News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून बापाच्या डोक्यात हैवान घुसला, मुलीसमोरच आईची केली हत्या

Akola Akot Crime News : अकोल्यातील अकोट फैल परिसरात पतीने चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा चाकूने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही हत्या १४ वर्षीय मुलीसमोर झाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • अकोल्यात चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केली

  • मुलीसमोर घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली

  • आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे

  • मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे

अक्षय गवळी, अकोला

अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीची हत्या केली. अकोल्यातल्या अकोट फैल पोलीस स्टेशन हद्दीतील राजू नगर भागात ही घटना घडली.. शेख शमिम शेख राजू असं मृत पत्नीच नाव आहे, तर शेख राजू शेख निजाम असं मारेकरी पतीच नाव आहे. या घटनेने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील अकोट फैल भागातल्या राजू नगर मधील शेख राजू हा रहिवासी आहे. शेख राजू आणि त्याच्या पत्नीमध्ये दररोज चारित्र्याच्या संशयावरून वाद व्हायचा. शेख राजू हा त्याच्या पत्नीवर संशय घेत होता, त्यामुळे तो त्याच्या पत्नीला सतत मारहाण आणि तिच्याशी वाद घालायचा. आज देखील सकाळी १० च्या सुमारास शेख राजू याने चारित्राच्या संशयावरूनच वाद घातला. भांडण सुरू असतानाच त्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली, शेख राजू याचा राग अनावर झाला आणि चाकूने तिच्या गळ्यावर वार करत तिला कायमचं संपवलं.

मुलीसमोर आईची निर्गुण हत्या..

दरम्यान, शेख शमिम हिच्या हत्यावेळी तिची १४ वर्षीय मुलगी घरातच होती. वडील आईला मारत असल्याच पाहत तिने जोरात आराडाओरड करत घरातून बाहेर पळ काढला. त्यानंतर घरासमोर शेजारील लोक जमा झाले. थोड्या वेळातच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शेख राजू याला अटक केली आहे.

आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून आज न्यायालयात हजर करणार आहेत. तर महिलेचा मृतदेह शव विच्छेदन वैद्यकीय तपासण्यासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात रवाना केला आहे. याप्रकरणी अधिक तपास अकोट फैल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेख रहीम यांच्या मार्गदर्शनात एपीआय जनार्दन खंडेराव करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी; भाजपमध्ये मोठा फेरबदल; अनेक नेत्यांची होणार उचलबांगडी, राजकीय उलथापालथ होण्यामागे कारण काय?

Maharashtra News Live Update: कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई, 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त

Veen Doghatli hi Tutena: 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य समोर; स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न?

विषारी दारू प्रकरणात मृतांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत; फडणवीस सरकारची घोषणा

मुंबईत ८२ इमारती अतिधोकादायक; २७३६ रहिवाशांचे जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT