WCD Recruitment saam tv
महाराष्ट्र

WCD Recruitment: आनंदाची बातमी! महिला व बालविकास विभागात नोकरीची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Women and Child Development Department Recruitment: महिला व बालविकास विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

महिला व बालविकास विभागात नोकरीची संधी

विविध पदांसाठी भरती जाहीर

स्पर्धा परीक्षा कशी होणार?

महाराष्ट्र शासनात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. महिला व बालविकास विभागात सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागात काही पदांसाठी विभागीय स्पर्धा जाहीर केल्या आहेत. यामुळे तरुणांकडे सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी आहे.

महिला व बालविकास विभागात अधिक्षक/निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, रचना व कार्यपध्दती अधिकारी, अधिव्याख्याता, सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित), बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) गट-ब पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीबाबत अधिक माहिती तुम्हाला https://wcd.gov.in/ या वेबसाइटवर मिळणार आहे.

महिला व बालविकास विभागात गट ब (राजपत्रित) पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुमची नियुक्ती महाराष्ट्रात कुठेही केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला ४१,८०० ते १,३२,३०० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत महागाई आणि इतर भत्तेदेखील होणार आहे.

या पदांसाठी भरती ही लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. तुमची ४०० गुणांची परीक्षा होणार आहे. त्यानंतर ५० गुणांची मुलाखत होणार आहे. या नोकरीसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पात्रता

महिला व बालविकास विभागातील नोकरीसाठी विभागातील किंवा ग्रामविकास विभागातील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना अर्ज करण्याची संधी आहे. अर्ज करण्यासाठी १ जानेवारी रोजी सलग सात वर्षे नियमित सेवा पूर्ण केलेली असावी.मराठी व हिंदी भाषा येणे आवश्यक आहे.

या नोकरीसाठील परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाईल. पेपर १ आणि पेपर २ अशी परीक्षा होईल. यानंतर मुलाखत होईल. परीक्षा केंद्र हे नवी मुंबई येथे असणार आहे. या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

LPG Cylinder Price: एलपीजी सिलेंडर ६५८ रुपयांनी स्वस्त मिळतोय, १०.५८ कोटी कुटुंबांना ९५८ रुपयांचा बंपर फायदा, पाहा नेमकं गणित

Weekly Horoscope: या राशींनी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं; वाचा तुमचं साप्ताहिक राशीभविष्य

भल्या पहाटे ८.२ तीव्रतेच्या भूकंपाने जमीन हादरली, 'या' देशाला त्सुनामीचा इशारा

Period changes with age: २०, ३० आणि ४० नंतर मासिक पाळीच्या फ्लो होतो बदल, डॉक्टरांनी सांगितली प्रत्येक वयोगटातील महत्त्वाची कारणं

SCROLL FOR NEXT