ACB, Bribe, solapur Saam Tv
महाराष्ट्र

Bribe : पाचशे रुपयाच्या लाच प्रकरणी महिला व बालविकास विभागातील ऑपरेटरवर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सदर बझार पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत.

विश्वभूषण लिमये

Solapur : पाचशे रुपयांची लाच (bribe) स्विकारल्या प्रकरणी एसीबीने (acb) साेलापूर (solapur) जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास विभागातील (department of women and child welfare) कॉम्प्युटर ऑपरेटरवर गुन्हा दाखल केला आहे. एसीबीच्या सापळ्यात कॉम्प्युटर ऑपरेटरवर पंचासमक्ष अलगद जाळ्यात अडकला. (Breaking Marathi News)

किशोर सखाराम मोरे (kishore more) असे लाच स्वीकारणाऱ्या ऑपरेटरचे नाव आहे. तक्रारदार यांच्याविरुद्ध त्यांच्या पत्नीने न्यायालयात (court) दाखल केलेल्या तक्रारीमध्ये समन्सची तारीख वाढवून देण्यासाठी आणि कोर्टात चांगला रिपोर्ट पाठवतो असे सांगून लोकसेवक किशोर मोरे यांनी 1500 रुपयांची लाचेची मागणी केली.

त्यामुळे तक्रारदाराने एसबीची कार्यालय गाठले. तेथे तक्रार नाेंदवली. त्यानंतर माेरेंनी त्यापैकी एक हजार रूपये स्वीकारले. उर्वरित पाचशे रुपयांच्या लाचेची पंचासमक्ष मागणी केली. उत्तर सोलापूर तालुका महिला आणि बालविकास विभाग संरक्षण अधिकारी अभय केंद्र कार्यालयातील ऑपरेटर माेरे याला 500 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

एसीबीच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनूसार किशाेर सखाराम माेरे याच्या विरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काेणी लाेकसेवक कामासाठी लाचेची मागणी करीत असेल तर जनतेने एसीबी कार्यालयात तक्रार द्यावी असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT