चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झालाय
सरपण आणण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने केला हल्ला
महिलेच्या मृत्यूने परिसरात भीतीचे वातावरण
चंद्रपुरात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चंद्रपूरच्या सावरला जंगलात ही घटना घडली. वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या घटनेनंतर वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी वनपरिक्षेत्रातील सावरला जंगल परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. वाघाच्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रमिला अरुण वाडगुरे (46) असे मृतक महिलेचं नाव आहे.
प्रमिला या सरपण आणण्यासाठी जंगलात गेली होती. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने संबंधित परिसरात गस्त वाढवण्यासोबतच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे.
गडचिरोलीतील चांभार्डा शिवारात एका वाघासोबत झालेल्या झुंजीत गंभीर जखमी झालेल्या नर बिबट्याचा अखेर मृत्यू झाला. मात्र, मृत्यूच्या काही वेळ आधी या बिबट्याने तीन गावकऱ्यांवर हल्ला केला. त्यांना जखमी केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
चांभार्डा ते मरेगाव पांदन रस्त्यालगत २५ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास हरिदास मुनघाटे यांच्या शेताजवळ एक बिबट्या जखमी अवस्थेत दिसला. हा बिबट्या जखमी अवस्थेत काही गावकऱ्यांच्या निदर्शनास आला. या जखमी बिबट्याने तिघांवर हल्ला केला होता. रस्त्याने जाणाऱ्या विलास दादाजी ठाकरे (४८), सौ. रेखा खुशाल मडावी (४५) आणि लुभाजी देवराव मुनघाटे (४०) या तिघांवर हल्ला करून जखमी केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.