jalna online fraud case saam tv
महाराष्ट्र

ऑनलाईन बिल भरण्यासाठी अॅप डाऊनलोड केलं, महिलेला घातला दोन लाख रुपयांना गंडा

दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून जालनामध्येही असाच प्रकार घडला आहे.

साम टिव्ही ब्युरो

जालना : दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीच्या (online fraud) गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून जालनामध्येही असाच प्रकार घडला आहे. तुमची लाईट कट होईल ,अॅनी डेस्क अॅप डाउनलोड करा, असा मॅसेज जालन्यातील अंकुशराव टोपे महाविद्यालयातील एका प्राध्यापक महिलेला आला होता. त्यानंतर त्या महिलेने अॅप डाऊनलोड केल्यानंतर एचडीएफसी बॅंकेच्या (hdfc bank) खात्यातून दोन लाख रुपयांची फसवणूक झाली. या सर्व प्रकाराबाबत महिलेने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल (police fir filed) करुन पुढील तपास सायबर पोलिसांकडे वर्ग केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यात सायबर क्राईमचे (cyber crime) गुन्हे वाढले असून अंकुशराव टोपो महाविद्यालयातील एका प्राध्यापिकेला दोन लाखांना सायबर चोरट्यांनी गंडा घातला आहे. महिलेच्या मोबाईल क्रमांकावर महावितरण कंपनीच्या नावाने एक मॅसेज आला होता. तुमचं वीज बिल भरलं नसल्याने तुमचं कनेक्शन कट केलं जाईल. तुमचं कनेक्शन जर कट कराचे नसेल तर अॅनी डेस्क अॅप डाउनलोड करा, असं त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं.

त्यानंतर महिलेने अॅप डाऊनलोड केले. पण सायबर चोरट्यांनी या अॅपद्वारे त्यांच्या एचडीएफसी बॅंक खात्यातील दोन लाख रुपये काढले. याप्रकरणी सदर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hotel room hidden camera: तुमच्या हॉटेलच्या रूममध्ये कॅमेरा तर लपवलेला नाही ना? छुपा कॅमेरा शोधण्यासाठी वापरा ही ट्रिक

उमेदवाराची रास कोणती? कशी असेल निवडणूक, भाग्य उजळणार की आणखी काही...वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये प्रचाराच्या सांगते वेळी दुर्दैवी घटना; रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट

Wednesday Horoscope: मकरसंक्रातीला या ४ राशींचं नशीब फळफळणार, प्रमोशनचा योग; वाचा बुधवारचे राशीभविष्य

KDMC मध्ये २१ उमेदवार बिनविरोध, सत्ताही आमचीच येणार; मंत्री पंकजा मुंडेंनी सांगितलं गणित

SCROLL FOR NEXT