शिवसेना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार ? संजय राऊत म्हणाले...

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून खासदारांची बैठक मातोश्रीवर आयोजित केली होती. या बैठकीनंतर संजय राऊतांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवर भाष्य केलं आहे.
sanjay raut
sanjay raut saam tv
Published On

रुपाली बडवे

मुंबई : शिवसेनेत शिंदे गटाच्या बंडळीनंतर पक्षात टोकाची कटुता निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्याच बरोबर शिवसेनेच्या खासदार देखील बंडाच्या तयारी आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना खासदार काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, देशात राष्ट्रपतिपदाची निवडणूक जवळ आली आहे, या निवडणुकीमुळे शिवसेनेवर दबाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून खासदारांची बैठक मातोश्रीवर आयोजित केली होती. या बैठकीनंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवर भाष्य केलं आहे. (Sanjay Raut News In Marathi )

sanjay raut
शिवसेनेचे 12 खासदार संपर्कात शिंदे गटात येण्याच्या तयारीत; रावसाहेब दानवेंचा दावा

'राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. शिवसेनेने राजकारणापलीकडे जाऊन राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला पाठबळ देण्यासाठी पाठिंबा दिला आहे. पक्षाकडून निर्णय घेतला जाईल, तो निर्णय पाळला जाईल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत', असे खासदार राऊत म्हणाले.

आमदार बांगर यांच्या हकालपट्टीवर भाष्य करताना राऊत म्हणाले, 'संतोष बांगर यांच्या हकालपट्टीची बातमी सामानात आली आहे. पक्षप्रमुख कोणाला हटवायचे हा निर्णय घेतात. त्यांना तो अधिकार आहे'. तसेच त्यांनी बाळासाहेब ठाकरे आमचे गुरू आहे, तसेच शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमचे गुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

sanjay raut
आगामी निवडणुकांसाठी रणनीती, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत होणार खलबतं

दरम्यान, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार गजानन किर्तिकर यांनी प्रतिक्रिया दिली. किर्तिकर म्हणाले,'राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर खासदारांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत १८ पैकी ४ खासदार गैरहजर होते.

या बैठकीत शिवसेनेच्या खासदारांनी भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवर उद्या भूमिका मांडणार आहेत. कोणताही वेगळा गट तयार केला जाणार नाही. एकनाथ शिंदे गटात कोण जाणार यावर चर्चा झाली नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com