Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: नवऱ्याचा फोन पाहिला अन् हादराच बसला! पती निघाला समलिंगी, महिला पोलिसाच्या पायाखालची वाळू सरकली

Crime News: सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी जाच आणि नंतर पतीचं समलिंगी असणं या दोन्ही गोष्टींचा महिलेला भरपूर मानसिक त्रास झाला. या प्रकरणी महिलेनं बाळापूर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली आहे.

Bhagyashree Kamble

पोलिस महिलेचा पती समलिंगी असल्याची धक्कादायक बाब अकोला जिल्ह्यात उघडकीय आली आहे. पतीच्या मोबाईल फोनवरील मित्रासोबत असलेले आक्षेपार्ह चॅट्स पाहून तिच्या पायाखालची वाळूच सरकलीय. सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी जाच आणि नंतर पतीचं समलिंगी असणं या दोन्ही गोष्टींचा महिलेला भरपूर मानसिक त्रास झाला. या प्रकरणी महिलेनं बाळापूर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली आहे.

पोलीस कर्मचारी महिलेसोबत एक अनेपक्षित घटना घडलीय. आधी सासरवास नंतर पतीचे परपुरूषांसोबत शारीरिक संबंध असल्याची माहिती मिळणं. या दोन्ही गोष्टींमुळे महिला मानसिकरित्या पूर्ण खचली आहे. या महिलेचं लग्न अडीच वर्षांपूर्वी बार्शीटाकळी तालुक्यातील एका युवकाशी झालं होतं. लग्नानंतर काही दिवस उलटून गेले. नंतर सासरच्या मंडळींनी जाच करायला सुरूवात केली.

काही ना काही कारणावरून शारीरिक आणि मानसिक छळ सासरच्या मंडळींकडून करण्यात येत होता. पतीनं आणि सासरच्या लोकांनी घर दुरूस्तीसाठी महिलेकडे १ लाख आणि शेतीचे कर्ज फेडण्यासाठी २ लाख, एकूण ३ लाख रूपये मागितले. तिने ते पैसे दिले. पण त्यानंतरही सासरच्या लोकांनी ५ लाखांची मागणी केली.

याच सासरच्या जाचाला कंटाळून पती आणि महिला दोन्ही अकोला शहरातील पोलीस वसाहतीत राहायला गेले. एके दिवशी महिलेनं असचं पतीचा मोबाईल फोन तपासण्यासाठी घेतला. पती मोबाईल चार्चला लावून बाहेर गेला होता. महिलेनं मोबाईल तपासला असता, महिलेच्या पायाखालची वाळूच सरकली. पतीचे पुरूष मित्रासोबत असलेले आक्षेपार्ह मेसेज पाहून पत्नीला मोठा धक्काच बसला.

याबाबत तिनं पतीला जाब विचारले असता, त्यानं समलिंगी असल्याचं कबूल केलं. तसेच फक्त पैशांसाठी लग्न केलं असल्याचं त्यानं सांगितलं. या प्रकणानंतर महिलेनं बाळापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी पोलिसांनी कौटुंबिक हिसांचाराच्या कायद्यानूसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी महिलेच्या सासरकडील ५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT