Solapur News
Solapur News Saam TV
महाराष्ट्र

Solapur News: मयत पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबियांकडून पेन्शनसाठी लाचेची मागणी, महिला लिपीक 'एसीबी'च्या जाळ्यात

विश्वभूषण लिमये

सोलापूर : भ्रष्टाचार ही व्यवस्थेला लागलेली किड आहे. मात्र भ्रष्ट सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांपुढील फाईल लाच घेतल्याशिवाय हलत नाही याची प्रचिती मयत पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबियांना आली. मयत पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबियांकडे फॅमिली पेन्शनसाठी लाच मागणाऱ्या महिला क्लर्कला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडलं आहे.

शिक्षण अधिकारी किरण लोहार यांना रांगेहात लाच स्वीकारताना पकडल्यानंतर सोलापूर लाचलूचपत विभागाने आणखी एक धडाकेबाज कारवाई केली आहे. जिल्हा कोषागार विभागाच्या महिला लिपिक अश्विनी बडवणे यांना 4500 रुपयांची लाच स्वीकारताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. (Solapur News)

तक्रारदाराचे वडील पोलीस खात्यात होते आणि काही महिन्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. सरकारी नियमानुसार त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना फॅमिली पेन्शन मिळते आणि त्यासाठी तक्रारदार ट्रेझरी शाखेत हेलपाटे मारत होते. फाईल पुढे सरकवण्यासाठी महिला क्लर्कने लाच मागितली होती. (Latest Marathi News)

तक्रारदाराने दीड हजार रुपये दिलेही होते. मात्र, दीड हजारावर महिला क्लर्कचे समाधान न झाल्याने तक्रारदाराने लाचलूचपत विभागाकडे धाव घेतली. त्यानंतर एसीबीने सापळा रचून महिला क्लर्कला रंगेहात पकडलं.

रत्नागिरीत दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात

खरेदीखतासाठी लाच मागणारे चिपळूण येथील दुय्यम सहाय्यक निबंधक आज लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रचलेल्या सापळ्यामध्ये अडकले आहेत. एका खासगी इसमाने यासाठी 7 हजारांची लाच पंचांसमोर स्वीकारली आहे. याप्रकरणी चिपळूणचे दुय्यम सहाय्यक प्रशांत रघुनाथ धोत्रे व अरविंद बबन पडवेकर या दोघांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला दहा हजार रुपयांची मागणी करणारे दुय्यम निबंधक यांनी सात हजार रुपयांमध्ये अंतिम तडजोड केली होती व ही रक्कम एका खासगी इसमाकडे सुपूर्द करण्यास सांगितले होते. लाचलुचपत विभागाने सापळा रचून लाच स्वीकारणाऱ्या खासगी इसमासह दुय्यम निबंधकांवर कारवाई केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT