Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : दुहेरी हत्याकांडातील साक्षीदार; महाराष्ट्रातून अपहरण, शेजारच्या राज्यात नेऊन हत्या, लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Sangli witness murder kidnapped maharashtra found dead karnataka : सांगलीच्या जत तालुक्यातील दुहेरी हत्याकांडातील साक्षीदाराचे अपहरण करून शेजारच्या कर्नाटक राज्यात नेऊन त्याची हत्या केली. कर्नाटकातील एका गावाबाहेर झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला.

Nandkumar Joshi

विजय पाटील, सांगली | साम टीव्ही

सांगलीच्या जत तालुक्यात तीन वर्षांपूर्वी घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराची अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकातील एका गावात साक्षीदाराचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. न्यायालयात जाण्यापूर्वी दुचाकीत पेट्रोल भरून येतो म्हणून ते घराबाहेर पडले होते. त्यावेळी त्यांचे अपहरण झाले. त्यानंतर २४ तासांत त्यांचा मृतदेह आढळला.

दादासाहेब नामदेव यमगर असं हत्या झालेल्या साक्षीदाराचं नाव आहे. सांगलीतील जत तालुक्यातील महानुवाडी येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडात ते मुख्य साक्षीदार होते. कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथून त्यांचं अपहरण झालं होतं. अपहरण करून त्यांना कर्नाटकात नेले आणि तेथे त्यांची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. कर्नाटकातील मदभावी येथे एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमाही होत्या.

डिसेंबर २०२३ मध्ये काय घडलं होतं?

डिसेंबर २०२३ मध्ये शेतातील सामायिक विहिरीच्या पाणी वाटपावरून यमगर भावकीतील दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. एका गटाने केलेल्या हल्ल्यात विकास नामदेव यमगर आणि प्रशांत दादासाहेब यमगर यांचा मृत्यू झाला होता. या दुहेरी हत्याकांडात दादासाहेब नामदेव यमगर हे मुख्य साक्षीदार होते. या हत्येचा खटला न्यायप्रविष्ठ आहे. या खटल्याची मंगळवारी न्यायालयात तारीख होती. दादासाहेब यमगर यांचा जबाब न्यायालयासमोर नोंदवण्यात येणार होता.

यमगर हे न्यायालयात जाणार होते. त्याआधी दुचाकीमध्ये पेट्रोल भरून येतो असे सांगून ते घरातून निघाले होते. त्यानंतर त्यांचे अपहरण झाले. याबाबत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात अपहरणाची नोंदही करण्यात आली होती. अपहरणानंतर २४ तासांच्या आत कर्नाटकातील मदभावी येथे त्यांचा मृतदेह आढळून आला. झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT