Nagpur Assembly heated debate over stray dogs and leopards during the winter session, as politicians clash over wildlife management Saam Tv
महाराष्ट्र

सरकारला कुत्रे पकडता येईना, बिबट्याचं काय? बिबट्यानंतर कुत्र्य़ांवरून अधिवेशन तापलं

Leopard vs Stray Dogs: बिबट्या आणि कुत्र्यांच्या मुद्द्यांवरून हिवाळी अधिवेशन चांगलच तापलयं... सत्ताधाऱ्यांना कुत्रे पकडता येत नाही तर बिबट्याचं काय पकडणार? अशी टीका विरोधकांनी केल्यानं सत्ताधारीही चांगलेच आक्रमक झालेत... नेमकं प्रकरण काय? बिबट्यावरून राजकारण कसं तापलयं.

Suprim Maskar

भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांची ही धावपळ सुरू आहे ती नागपुरातील विधानभवन परिसरात.... विधानभवन परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्यानं आमदार आणि मंत्र्यांना होणारा उपद्रव वाढला..आणि महापालिकेनं कुत्रे पकडण्यासाठी विशेष मोहीम आखली.. मात्र कुत्रे पकडताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली.. याचवरून सरकारला कुत्रे पकडता येत नाहीत बिबटे कसे पकडणार , असा खोचक प्रश्न जयंत पाटलांनी विचारला... तर दुसरीकडे आमदाराच्या घरात बिबट्या घुसत नाही, तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही, असं म्हणत बच्चू कडूंनी सत्ताधाऱ्यावर जोरदार हल्लाबोल केलाय...

दुसरीकडे विरोधकांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलयं... जयंत पाटील कुत्रे आणि बिबटे पकडू शकतात का? असा टोला आमदार सुधीर मुनगंटीवारांनी पाटलांना लगावलाय.... तर बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या रवी राणांनीही विरोधकांवर जोरदार टीका केलीय..

राज्यात कोकणापासून विदर्भापर्य़ंत आणि खान्देशापासून मराठवाड्यापर्यंत सर्वत्र बिबट्यांचा संचार वाढलाय...मात्र राज्यात बिबट्याची दहशत कशी वाढलीय... आणि रेस्क्यू सेंटर्सची क्षमता किती आहे?

राज्यातील 29 जिल्ह्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय... विशेष म्हणजे 2022 च्या आकडेवारीनुसार राज्यात बिबट्यांची संख्या 2 हजार 285 पेक्षा जास्त आहे.. 2025 मध्ये ही आकडेवारी तिप्पट झाल्याची शक्यता आहे... आतापर्यंत 91 बिबट्यांना जेरबंद करण्यात आलेलं असून रेस्क्यू सेंटर फक्त 3 आहेत...त्यात आतापर्यंत 122 बिबटे ठेवण्यात आलेत..त्याशिवाय राज्यात बिबट्यांच्या ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरची संख्या 12 आहेत....

आधीच बिबट्याचा नैसर्गिक अधिवास नामशेष झाल्यानं आणि खाण्याची कमतरता भासत असल्यानं बिबटे शेतशिवारात आणि मानवी वस्तीकडे वळू लागलेत...जेरबंद केलेल्या बिबट्यांना ठेवण्यासाठी रेस्क्यू सेंटरचीही कमतरता आहे आणि तिथेही बिबट्याच्या खाण्याची आबाळ होतेय..त्यातच बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी 1 कोटींच्या शेळ्या सोडण्याची वनमंत्र्यांची घोषणाही अजबच आहे. हिवाळी अधिवेशनानंतर तरी बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना होणार का? याकडे अनेकाचं लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Warm Water Bath: रात्री कोमट पाण्याने आंघोळ केल्याने 'या' समस्या होतील दूर

राज्य सरकारचा पुरस्कार मिळवलेल्या अभिनेत्याचा मृत्यू, घरातच मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News Update: पगार रखडल्याने शिक्षकांचं आंदोलन

झोपडपट्टीधारकांना मिळणार हक्काचं घर; २.५ लाख लोकांना होणार फायदा, सरकारचा मोठा निर्णय

Blood Sugar: हेल्दी खाल्लं तरी ब्लड शुगर वाढते; कारणं काय असू शकतात, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT