Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: सेनेची मनसे होणार? उद्धव ठाकरे CM शिंदेंवर मात करणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Thackeray Group News: आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची मनसे सारखी अवस्था होणार का? वाचा स्पेशल रिपोर्ट

Saam Tv

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. त्यापार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. लोकसभेला ठाकरेंना अपेक्षित यश मिळालं नाही. त्यातच बालेकिल्ले राखण्यात अपयश आलं. त्यामुळे 2014 आणि 2019 मध्ये मुसंडी मारणाऱ्या ठाकरेंसमोर शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेनेची मनसे होऊ न देण्याचं नवं आव्हान निर्माण झाल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय. याचबद्दल बोलताना सकाळचे सहयोगी संपादक प्रकाश पाटील म्हणाले की, जागा घसरल्या तर शिवसेनेची मनसे होणार.

राज ठाकरेंच्या मनसेने मारलेली मुसंडी आणि त्यानंतर झालेली घसरण तसंच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा उंचावत जाणारा राजकीय आलेख कसा आहे, हे जाणून घेऊ....

शिवसेना-मनसेची राजकीय वाटचाल

विधानसभा निवडणूक 2009 मध्ये पक्षाच्या स्थापनेनंतर मनसेचा 13 जागांवर विजय मिळाला होता. 2009 मध्ये शिवसेनेचा 44 जागांवर विजय मिळाला होता. 2014 च्या निवडणुकीत मनसेच्या हाती अवघी 1 जागा आली. तर 2014 मध्ये शिवसेनेची 63 जागांवर मुसंडी मारली.

पुढे 2019 च्या निवडणुकीत मनसेला फक्त 1 जागा जिंकता आली. 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचा 56 जागांवर विजय मिळाला. 2022 मध्ये शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंच्या सोबत 16 आमदार राहिलेत. पक्षफुटीनंतर 40 आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली. त्यामुळे खिळखिळ्या झालेल्या संघटनेला उभारी देण्याचं एकमेव आव्हान नाही तर आव्हानांची मालिकाच ठाकरेंपुढे उभी आहे.

ठाकरेंपुढे विधानसभेचं आव्हान?

  • पक्षात वजनदार नेते न राहिल्याने नव्या फळीसह संघर्ष करावा लागणार.

  • भाजप आणि एकनाथ शिंदेंसोबत दोन हात करण्याचं आव्हान.

  • शिंदेंप्रमाणेच नव्या उमेदवारांना रसद पुरवावी लागणार.

  • बालेकिल्ला असलेल्या ठाणे-कोकणात ठाकरेंना लोकसभेत अपयश.

  • लोकसभेला ठाकरेंचा स्ट्राईकरेट घटल्याने मविआत जास्त जागा मिळवण्याचे आव्हान.

  • लोकसभेनंतर ठाकरे गटाकडे इनकमिंगचा ओघ ओसरला.

  • मुख्यमंत्रिपद हवं असल्यास काँग्रेस आणि पवारांपेक्षा जास्त जागा जिंकण्याचं आव्हान.

ठाकरेंनी मोदी शाहांविरोधात आघाडी उघडली असली तरी पक्षफुटीनंतरच्या सहानुभूतीचं मतांमध्ये रुपांतर करण्यात यश मिळालं नाही. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीप्रमाणे ठाकरेंना पुन्हा मैदानात उतरून लढावं लागेल. तसंच ठाकरे नावाचा ब्रँड आणि पक्ष फुटीनंतरची सहानुभूती मतामध्ये रुपांतरीत करता आली तर ठाकरेंचा करिष्मा विधानसभेत पहायला मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुजरात एटीएसची मोठी कारवाई; 500 किलो ड्रग्स जप्त, इरानी बोटीतून होत होती तस्करी

Dolly Chaiwala: भाजपच्या प्रचारात डॉली चायवाल्याची झापूक- झुपूक एन्ट्री; Photos पाहा

Best Sunset Places: ऐन थंडीत निर्सगाच्या सानिध्यात तुम्हालाही sunset चा आनंद घ्यायचाय, तर मुबंईजवळील या स्थळांना नक्की भेट द्या

Ranji Trophy 2024-25: कुंबळेनंतर दुसरा भारतीय गोलंदाज अंशुल कंबोज, एकाच इंनिगमध्ये घेतले १० विकेट्स

VIDEO : क्षणभर विश्रांती! आदित्य ठाकरेंनी प्रचारादरम्यान लुटला गल्ली क्रिकेटचा आनंद

SCROLL FOR NEXT