Corona Cases Saam tv
महाराष्ट्र

Corona Cases: २०२० सारखी कोरोनाची लाट पुन्हा येणार? भारतात कोरोनाचा कहर वाढणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

COVID 19 Pandemic: भारतामध्ये दररोज कोरोना रुग्ण वाढत आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येवरून २०२० मधील कोरोना लाटेची पुनरावृत्ती होण्याची भीती वाढत आहे. सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Girish Nikam

२०२० मधील कोरोनाच्या कटू आठवणी कोणीही विसरले नाहीत. मात्र आता अनेकांच्या मनात पुन्हा धडकी भरली आहे. कारण २०२० सारखी कोरोनाची लाट पुन्हा येणार? असा मेसेज व्हायरल होतोय. या मेसेजची आम्ही पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलंय. पाहूया खास रिपोर्ट.

देशात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलय. कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतातल्या कोरोना रुग्णांची संख्या ४ हजारांच्या वर गेलीय. अशातच भारतात २०२० सारखी कोरोनाची लाट येणार असल्याचा दावा केला जात असल्यानं सर्वत्र खळबळ उडालीय. व्हायरल मेसेज मध्ये नेमका काय दावा करण्यात आला आहे.

भारतात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. ही रुग्ण संख्या पाहता २०२० सारखी कोरोनाची लाट पुन्हा येण्याची दाट शक्यता आहे. सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत दररोज ९३ हजार कोरोना रुग्ण आढळून येत होते. ही पहिली लाट ३७७ दिवस होती. त्यात एक कोटी आठ लाख रुग्ण आढळून आले त्यापैकी जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू झाला.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. खरंच भारतात पुन्हा कोरोनाची लाट येईल का? २०२० सारखी भयानक स्थिती पुन्हा पाहायला मिळेल का? असे सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्यामुळे साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली. याबाबत तज्ञ अधिक माहिती देऊ शकतात. त्यांना हा मेसेज दाखवला, तेव्हा त्यांनी काय सांगितलं पाहा.

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा

भारतात कोरोना रुग्णांची संख्या ४ हजारांच्या वर गेलीय. केरळपाठोपाठ महाराष्ट्रातही रुग्णांची संख्या वाढते आहे. कोरोना रोगांची संख्या वाढत असली तरी २०२० सारखी कोरोनाची लाट येण्याची शक्यता नाही. Covid, SARS-CoV 2 हे विषाणूचे व्हेरिएंट आहेत. मात्र विषाणूचा हा व्हेरिएंट आता तसा सामान्य आहे. कोरोनाचा विषाणू म्युटेट होत असतो म्हणजेच त्यात सातत्याने बदल होतो. आता कोरोना व्हायरसला ५ वर्षे झाली आहेत. आता नियमित श्वसन विकारांप्रमाणेच हा विषाणू आहे. त्यामुळे लगेचच घाबरून जाण्याचं कारण नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT